काल सकाळी ऑफिस ला आले.. नेहमीप्रमाणे Hi, good morning करत माझ्या डेस्कपाशी आले. योगेश (माझ्या शेजारी बसतो) आधीच आला होता. मी आलेले बघून त्याने पटकन वळून विचारलं
"काल पेपर मध्ये वाचलस का?"
" काय????"
"तो केदार देशपांडे गेला..."
"कोण रे??"
"अगं तो माझ्या ट्रेकिंग ग्रुप मधला... enduro-3 जिंकलेला..."
"काय सांगतोस??? कसा काय?"
"सकाळ ला आली आहे ना बातमी...वाचली नाहिस का?"
मी काहिच बोलले नाही.... मशिन चालू करून आधी इ-सकाळ उघडला....
तशी या केदारला मी कधी प्रत्यक्ष बघितले नाही. योगेश कडूनच मी त्याच्याबद्दल ऐकलं होतं, बरेच फोटो बघितले होते. केदार....इतर चार जणांसारखा मुलगा. BE झाल्यावर रितसर एका मोठ्या IT कंपनीमध्ये सर्व्हिस करत होता. लहानपणापासून याला ट्रेकिंगचा अतिशय नाद... केदार आणि मंदार (जुळा भाऊ) ने मिळून अनेक ट्रेक केले. सर्व्हिस सुरू झाल्यावर केदार ने कंपनीतच एक treker's club चालू केला. उन्हाळा,पावसाळा कुठलाहि ऋतू असो.... २-३ weekend गेले कि एखादा नवीन ट्रेक करायचा. long weekend ला काहितरी मस्त प्लॅन करायचा... हे सगळं अगदी रूटिन. जणू डोंगर, दऱ्या-खोऱ्या फिरणं हाच त्याच्यासाठी श्वास!!!
यावर्षी enduro3 हि स्पर्धा केदार ने आपल्या सोबत एक मित्र-मैत्रीण घेऊन प्रथम क्रमांकाने जिंकली. योगेशला त्या दिवशी झालेला आनंद अजून आठवतो मला!!! लगेच दुसऱ्याच दिवशी केदारचे enduro3 मधले फोटो बघितले. ते सगळं वाचताना, फोटो बघताना मलापण आनंद होत होता. आणि मला आश्चर्य वाटलं ते याचं कि इतका मोठा ट्रेक करून हा मुलगा दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे ऑफिस मध्ये होता!!! अशा साहसाची, कष्टांची त्याला इतक्या लहानपणापासून सवय होती कि असं काहि केलं नाहि तरच त्याला चैन पडत नसावं.
दरम्यान केदार-मंदार चा वाढदिवस झाला. वयाची २५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल योगेश त्याची फोनवर खेचत होता. तेव्हा कुठे कोणाला माहित होतं कि हा दिवस परत फिरून केदारच्या आयुष्यात येणारच नाहीये.
इ-सकाळ मध्ये ही बातमी वाचली अन क्षणभर काहि सुचेनासं झालं. हे कसं शक्य आहे असं राहून राहून वाटलं. कित्येक गड हा मुलगा लिलया चढला होता... सिंहगड तर त्याला अतिपरिचीत होता. धोक्याच्या जागा माहित नसणं, पुढचा मागचा विचार न करता काहितरी साहस करणं असं काहि केदार बाबतीत झालं असण्याची शक्यता कमीच. मग नक्कि काय झालं?? कि वेळच सांगून आली होती?? ज्या छंदासाठी तो जगत होता त्या छंदानेच त्याच्यावर झडप घालावी!!! आणि अशाप्रकारे कि त्याला कसला विचार करायची उसंतच मिळू नये?? हे सगळंच दुर्दैवी आहे.
मी कोण, कुठली.... आम्ही कधी प्रत्यक्ष भेटलो नाहि तर मला या यातना होत आहेत.... मंदार, त्याचा सख्खा जुळा भाऊ, त्याला काय होत असेल? लहानपणापासून सावलीसारखे सोबत असलेले हे जुळे भाऊ.... एक गेला तर दुसऱ्याचं अस्तित्व हरवावं इतके जवळ. आई-बाबांनी कसं सहन करावं?? तरणा ताठा, सुविद्य, सुसंस्कारी मुलगा.... नेहमीप्रमाणे ट्रेकला जातो आणि घरी परत येतो तो त्याचा मृतदेह!!! नियतीने क्रूर थट्टा केली या कुटुंबाची.
मला सगळे गड चढून बघायचे आहेत हि इच्छा असणाऱ्या केदार ने मरणाचा गड पण किती सहज पणे पार केला. पण तो इतक्या लवकर करायला नको होतास केदार!!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
6 comments:
वाचून वाईट वाटलं. योगेशने बहुतेक फोटो लावला होता केदारचा एका पोस्टमध्ये. दुर्देव केदारचे नाही, तो आपला छंद पुरा करतानाच सुख पावला परंतु वाईट आई-वडिलांचे वाटते की मुलांना मोठं करून, जोपासून ती अशी एक दिवस आयुष्यातून उठून जातात. खरंच क्रूर थट्टा... वाईट वाटलं.
मंदार आणि त्याच्या आईबाबांसमोर अजून उभं राहण्याचं धैर्य नाही. :((
:-(( SinhagaDaavar asa vhaava mhaNje kharach durdaiva! o tar puNyaatlyaa trekkers naa tu mhaNtes tasa atiparichayaachaa!! :-( prachanD vaaeeT vaaTala vaachun. ChinchwaD chaa hotaa mhaNaje malaa maahit asaaylaa havaa hotaa, paN kadhee naav aiklyaacha aaThawat naahee...
man viShaNN hota asa kaahee aikla kee! :-(
फारच वाईट झालं. मंदार आणि त्याच्या आई वडिलांना ह्या कठीण प्रसंगातून जाण्याचे बळ मिळो. आपण त्यांचे कोणीही नसलो तरी त्यांच्या दुःखाची कल्पना करता येते.
vachun ek juni ghatana atahavali.....26 January.....mahuligad....asach ek kedar....
This is terrible.
Asha ghatana kalalyavar vatte kee koni ardha daav sodoon gela, pan tyacha daav kiti ghadincha hota he niyati konalahi kaloo det nahi.
Post a Comment