Wednesday, March 07, 2007

८ मार्च...महिलादिन!!!

काल रात्री साधारण ११.३० ला झोपले. अजून पूर्ण झोप लागायची होती..इतक्यात ऑफिस मधल्या एका मैत्रिणीचा SMS आला. "Happy Womens Day!!!" घड्याळ बघितलं तर १२ वाजून गेले होते. तिला "same 2 u" टाकून झोपले. पण झोप लागली नाही. डोक्यात विचारचक्र सुरू झालं.
आजचा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणजेच आज महिलांचा गौरव, गुणगान, स्तुती केली जाणार. पेपर, टीव्ही सगळीकडे आज महिलांसाठी काहि खास असेल. त्यातले कित्येक जण आज स्त्री पुरुषाच्या बरोबरीने कशी आहे, स्वत:ला कशी सिद्ध करते वगैरे बोलतील. पण हे कितपत खरं आहे?? वस्तुस्थिती काय आहे हे जास्त महत्त्वाचं.
स्वातंत्र्यपूर्व काळापेक्षा आजची स्त्री नक्किच अधिक स्वावलंबी, कणखर आहे. यंदा देशाला स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे पूर्ण होतील. इतक्या मोठ्या काळात देशातील किती स्त्रिया महत्त्वाची पदे (आरक्षणाशिवाय) मिळवू शकल्या?? सक्रिय राजकारण ते अगदी रोजच्या जीवनातला दूधाचा व्यवसाय... कशाचाहि विचार करूयात.
एक महिला पंतप्रधान - स्व. इंदिरा गांधी, एक तडफदार पोलीस अधिकारी - किरण बेदी (इतरही काहि आहेत पण केलेले काम लक्षात घेता एकच नाव पुढे येते), एक top executive - इंद्रा नूयी, एक पत्रकार - बरखा दत्त, एक पी. टी. उषा, सानिया मिर्झा, अंजू बेबी जॉर्ज, कुंजरानी देवी. संगीत हा भारतीय सिनेमाचा आत्मा!! त्यातही किती कमी क्षेत्रात महिला आहेत. उषा खन्ना सोडून एक संगीत दिग्दर्शिका नाही. कॅमेरा, editing, script writting, lyrics इ. अनेक क्षेत्रात नाहीच आम्ही. महिलांवर होणाया अन्यायावर बोलायला १०० महिला जमतील पण किती जणी न्यायाधीश, सरन्यायाधीश होत्या/ आहेत?? Finance हा कुठल्याही व्यवसायाचा कणा.... किती महिला आज मोठ्या कंपनीच्या CFO आहेत?? राजकारण जे देशाची स्थिती बदलू शकते त्यात आमचा सहभाग किती? अर्थमंत्री, गृहमंत्री अगदी लोकासभा प्रवक्ती म्हणून कोण आहे?? दैनंदिन जीवनात आज media ला असाधारण महत्त्व आहे...तिथे किती महिला आहेत? वृत्तनिवेदिका, talk show वाल्या 'य' आहेत, पण न्यूज एडिटिंग सारख्या जागी किती??
सुंदर दिसावं हि कुठल्याहि स्त्रीची उपजत इच्छा असते... पण या बाह्यसौंदर्याचं महत्त्व आम्हीच नाही ना वाढवून ठेवलं? क्रिकेट सारख्या खेळावर चर्चेसाठी भिल्लांसारख्या कपड्यांची गरज असते??? शरीराचा जो भाग दिसू नये म्हणून कपडे घालावे तोच कपडे घालून उघडा पाड्ण्यात कसली महानता, कसलं स्त्रीत्व??? बड्या पार्टीज ना पुरूष मारे सूट-बूट घालून येतील आणि बायका खांदे उघडे, पाय उघडे असलं काहि घालून येतील. शरीरसंपत्तीचे भांडवल करायची इतकि सवय जडलिये कि त्याची अनावश्यकता, उथळता च दिसत नाही आम्हाला.
Fashion designing, tailoring, jwellery designing या सगळ्याच क्षेत्रात पुरुष जास्त पुढे आहे. साधी गोष्ट घ्या, पुण्यासारख्या शहरात उत्तम ब्लाऊज शिवणारे बहुसंख्य लोक हे पुरूष आहेत. पाककला हे तर पूर्वापार चालत आलेलं महिलाप्रधान क्षेत्र पण नावाजलेले, आघाडिचे सर्व शेफ पुरूष आहेत!!!
आपल्या सूनेला आपला मुलगा घरकामात मदत करतो याचा त्रास सासूला होतो कि सासयांना?? गृहिणी असणाया महिलेचा अनादर अनेकदा इतर महिलाच करताना दिसतात. दोन बायका एकत्र काम करत असतील तर त्यांचे पटणे हे खूप अवघड असते यावर क्वचितच दुमत असेल. माझा स्वत:चा अनुभव आहे कि एक पुरूष manager ज्या पद्धतीने महिला sub-ordinates, collegues ना वागणूक देतो ती एका महिला manager पेक्षा नक्किच चांगली असते. एक स्त्रीच स्त्री ला समजून घेत नसेल, अनाठायी ईर्षा, दु:स्वास करत असेल तर या महिलादिना चा काय उपयोग आहे?
शारिरीक भेद, क्षमता हे निसर्गदत्त आहे. ज्याप्रमाणात पुरूष शारिरीक शक्ती च्या जोरावर काहि ठिकाणी पुढे जाउ शकतील ते स्त्री साठी कठिण असेल. कारण लिंगभेद हा शेवटी शरीररचनेमुळे आहे, बुध्दी, वैचारिक शक्ती यावर ते अवलंबून नाही. स्त्रियांना असणारे भय, असुरक्षितता ही पण आकलनीय बाब आहे. (याबद्दल बोलण्या-लिहिण्याजोगे बरंच आहे, पण त्याबद्दल नंतर कधीतरी..) पण हे सगळे असूनहि आम्ही बौद्धीक आघाडीवर खूप मागे आहोत.
समानतेची बात करताना आम्हाला आरक्षण, अर्थव्यवस्थेत वेगळी तरतूद का लागते? (Tax exemption limit) जातीयवाद जितका धोक्याचा तितकाच हा भेद धोक्याचा नाही का?
समाज कुठल्याहि चांगल्या गोष्टीचे स्वागत, कौतुक करतो. सचिन ला कधीच ओरडून सांगावं लागलं नाही कि तो उत्तम क्रिकेटपटू आहे. लता मंगेशकर तुमच्या मागे लागली नव्हती कि माझी गाणी डोक्यावर घ्या. मनिष मल्होत्रा चा dress sense त्याच्या कामातून दिसून आलाच. २ वर्षापूर्वीपर्यंत चेष्टेचा विषय असलेले लालू प्रसाद यांच्या रेल्वे बजेट ची याच लोकांनी वाहवा केली. मुद्दा हा कि चांगल्या कामाची दखल नेहमीच घेतली जाते. त्याचे कौतुक करताना लोक मग अशा अमूक दिवसाची वाट बघत नाहीत. महिला पुढे असतील, स्वतंत्र असतील तर समाजाची मान्यता मिळणारच आहे... त्यासाठी आजच्या दिवशी आम्हीच आमचा सत्कार करून घ्यायची गरज नाही. जे साध्य झालंय तो मॅचचा पहिला बॉल आहे, अजून पूर्ण ५० षटकं खेळायची आहेत. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन कसे चालेल?

16 comments:

अनु said...

"bhillinisarakhe kapade" ha shabdaprayog avadala.

Deepa said...

A good one! Food for a lot of thoughts which have been breeding in my mind off late.
Keep writing!!!

HAREKRISHNAJI said...

खरय. आज जागतिक महिला दिन म्हट्ल्यावर मला पहिल्यादा बैलाचा पोळा हा सण आठवला, आज महिलांचा गौरव, गुणगान, स्तुती केली जाणार आणि उद्द्यापासुन पसत त्या कामाच्या घाण्याला जुपल्या जाणार.

प्ररतु आता चित्र नक्कीच बदलत चाललय.

yogesh said...

हरेकृष्णाजींची प्रतिक्रिया सही आहे ;)हे पण वाच...
Keep writing :)

बेधडक said...

अरेच्चा! हे काय आम्ही लेख लिहिला तसा आणखी एक लेखही येथे आहे. एवढेच नव्हे तर हरेकृष्णजी तुम्ही पोळ्याचे दिलेले उदाहरणही आमच्या लेखात आहे.

मजेशीरच. great minds think alike!!

स्नेहल, तुमचा लेख आवडला.

Amol Padmawar said...

Snehal.. tumchya bolg chi nehamich waat pahat asto... nehami pramane ha lekh pan khup chaan lihila aahe... nakkich vichaar karaayla laavnaara..

aattach aai shi bolalo phone var aani mahila dinaachya shubhechcha dilya... pan nemka kasha sathi tech kalala naahi... well, aai la wish karnya sathi kontya divsaachi garaj bhasu naye...

anyway, lihit raha... tuchya pudhchya lekhaachya apekshet,

Amol Padmawar

Priyabhashini said...

lekh aawadalaa.. vichar karayalaa pravrutt karanaara.

कोहम said...

snehal....comparison chi avashyakata kharach aahe ka? je tu karu shakates te me karu shakat nahi mhanun me kamipana ka manaycha...pratyek fulane swatantrapane fulava.....bajucha phul kasa phulatay te kashala pahava....kimva apples and oranges chi comparison karavi ka....lihilays changla...keep it up...

TheKing said...

Very nice thoughts!

Koham - I think Snehal is making a point here by trying to compare oranges with oranges and apples with apples. While talking only about women, or women music directors to be specific how many names can you recollect at once? I could recollect Lata Mangeshkar, Meena Mangeshkar - who are again world class celebrities, Usha Khanna as Snehal has mentioned but none beyond that.

I think such Women's day should used by women about thinking what they have done/achieved or what they plan to do/achieve than talking loudly only about how the world is unfair to them.

Snehal said...

सगळ्यांना धन्यवाद!!!

अनु, :)

दीपा, Looking forward for your blog now.

कृष्णाजी, अगदीच बैल पोळा नाही म्हणता येणार. या दिवशी आत्मस्तुती जास्त होते. माझा सर्वात जास्त आक्षेप त्याला आहे.

योगेश, छान आहे लोकसत्ता मधला लेख.

बेधडक, :).

अमोल, प्रिया - या लेखामुळे विचार करावासा वाटला हे वाचून समाधान वाटले.

कोहम, तुलना नाहीये. पण आम्हीहि सगळं करू शकतो हो जी आत्मप्रौढी दिसते आजकाल ती किती फोल आहे हे लिहावसं वाटलं. तुलना तर दोन भाऊ, बहिण यातहि जर होऊ शकत नाही तर हे खूपच अवघड आणि अन्यायकारक आहे.

किंग, धन्यवाद. मला हेच म्हणायचे आहे.

Tulip. said...

chhaan lihil ahes snehal. muli ani striya swat:cha potential eka tar pures olakhatach nahit kiwa bhalatikadech te exploit hota jatana nusatach shant pane baghat rahatat. hya divasachya nimittane introspection jhal tari khup kahi achieve jhal mhanayach:D

Narendra Gole said...

बडबडी खरंय तुझे म्हणणे.

आपण असा विचार करायला हवा की छोट्याछोट्या गोष्टींमध्ये निर्णय कोण घेतो? घरातील स्त्री निर्णय घेऊ शकते का? घेते का? समजा घरातील नळ गळतो आहे. तो घरातल्या घरातच दुरूस्त करता येईल का की प्लंबर बोलवावा? हे कोण ठरविते? घरीच दुरूस्त करता येईल असे ठरवून दुरूस्त करणारे अनेक पुरूष मी पाहिलेले आहेत मात्र असे करू शकलेली एकही स्त्री माझ्या पाहण्यात नाही. सगळ्या गोष्टी मला का करता येऊ नयेत? हा प्रश्न प्रत्येक पुरूष स्वत:ला सदैव विचारत असतो. त्याचे उत्तर द्यायचा मन:पूर्वक प्रयत्नही करत असतो. स्त्रियांनीही हे साधल्यास समानता आणण्यासाठी दिवस साजरे करण्याची गरज राहणार नाही असे मला वाटते. ह्याबात काय म्हणशील?

नरेंद्र गोळे
२००७०३१२

सहज said...

thought provoking !!

जयश्री अंबासकर said...

बडबडी... फ़ारच सुरेख झालाय लेख. खरंच हे सगळं विचार करण्यालायक आहे.

Anonymous said...

AV,無碼,a片免費看,自拍貼圖,伊莉,微風論壇,成人聊天室,成人電影,成人文學,成人貼圖區,成人網站,一葉情貼圖片區,色情漫畫,言情小說,情色論壇,臺灣情色網,色情影片,色情,成人影城,080視訊聊天室,a片,A漫,h漫,麗的色遊戲,同志色教館,AV女優,SEX,咆哮小老鼠,85cc免費影片,正妹牆,ut聊天室,豆豆聊天室,聊天室,情色小說,aio,成人,微風成人,做愛,成人貼圖,18成人,嘟嘟成人網,aio交友愛情館,情色文學,色情小說,色情網站,情色,A片下載,嘟嘟情人色網,成人影片,成人圖片,成人文章,成人小說,成人漫畫,視訊聊天室,性愛,a片,AV女優,聊天室,情色

木須炒餅Jerry said...

cool!very creative!AV,無碼,a片免費看,自拍貼圖,伊莉,微風論壇,成人聊天室,成人電影,成人文學,成人貼圖區,成人網站,一葉情貼圖片區,色情漫畫,言情小說,情色論壇,臺灣情色網,色情影片,色情,成人影城,080視訊聊天室,a片,A漫,h漫,麗的色遊戲,同志色教館,AV女優,SEX,咆哮小老鼠,85cc免費影片,正妹牆,ut聊天室,豆豆聊天室,聊天室,情色小說,aio,成人,微風成人,做愛,成人貼圖,18成人,嘟嘟成人網,aio交友愛情館,情色文學,色情小說,色情網站,情色,A片下載,嘟嘟情人色網,成人影片,成人圖片,成人文章,成人小說,成人漫畫,視訊聊天室,性愛,成人圖片區,性愛自拍,美女寫真,自拍