Wednesday, August 11, 2010

फिर मिलेंगे

"अगं पूर्ती, बोलत का नाहियेस. बोल ना"
".........."
"इतके सगळे जमले आहेत म्हणून बोलता येत नाहीये का तुला?? आठवतं, १० वर्षांपूर्वी आमच्याकडे या घरी पहिल्यंआदा आली होतीस तेव्हा पण जास्त काहीही बोलली नव्ह्तीस. मग लग्न करून घरी आलो तरी २-३ दिवस गप्प गप्प च होतीस. मीच विचारलं तेव्हा म्हणालीस कि खूप जण असताना तुला दडपण येतं. वेडाबाई!!! मग केरळ मधे गेल्यावर मस्त बोलायला लागली होतीस. मस्त होते ना गं ते दिवस!! तर आज पण खूप जण जमले आहेत परत म्हणून का बोलत नाहीयेस तू?"
".........."
"रागावली आहेस माझ्यावर? तुला आधी काही कल्पना न देता मला असं अचानक जावं लागतंय म्हणून?"
तिच्या डोळ्यात फ़क्त पाणी...
"मला पण अगदी आयत्यावेळी कळलं गं. नाहीतर आपण ठरवलेलं सगळं असं अर्धवट टाकून जाईन का मी?"
".........." ती एकदा डोळे भरून बघून घेते त्याला.
"पण आता मी इथे नसेन तर तू काळजी घ्यायचीस हा! गाडी नीट चालवत जा. ओम ला सांभाळ आणि त्याबरोबर स्वत:ला पण. सगळ आपण ठरवलंय तसं कर.. तुझ्याच वर सोपवतोय ना मी सगळं शेवटी. पण तू करशील ना राणी? पैशाची काळजी नको..त्याची सोय मी आधीच केली आहे. आपल्या एजंट मेहतांना माहीत आहे सगळं आणि माझ्या कपाटात फ़ाईल आहे त्यात पण एकत्र आहे सगळं"
नजर वर फ़िरवून ती नुसतीच मान हलवते.
"सगळी घाई ना माझी आयत्यावेळी! :) म्हणतेस्च की नेहमी तू तसं. आणि खरं पण आहेच ते. मला इतका ताण घ्यायचा नव्हता गं पण ऑफिस म्हण्लं कि हि अशी दगदग येतेच ना! त्यात यंदा माझं promotion due!"
"नाही रे...तुला चिडवायला म्हणते मी तसं. ्पण तू ताण जरा कमी केला असतास तर!! ओम ला कसं समजावू मी?"
"अगं, होईल सगळं नीट हळूहळू. तू धीराची आहेस माहीत आहे मला"
"म्हणून मला असं एकटीला सोडून निघालास? कसे राहू आम्ही तुझ्याशिवाय?"
"अगं मलाच नाही कळलं ग...."
".........."
"हो, आणि मी आहेच ना तुझ्याबरोबर! आठव ओम झाला तो दिवस....ओम ने विश्वनिर्मीती झाली म्हणून आपण आपलं विश्व देणार्या बाळाचं नाव ओम ठेवलं. आणि तू म्हणाली होतीस कि ओम मध्ये तुला मी दिसतो. खरं सांगू, मला माझीच भीती वाटते गं. तुझ्यासोबत, ओम आहे. आपलं हे घर आहे...मी तिथे एकटाच असेन ना! मल सगळंच नवीन... "
".........."
"बोल ना गं. विमानाची वेळ होत आली. बोल ना"
ती हलकेच त्याच्या जवळ गेली....चेहर्यावरून अलगद हात फ़िरला. "मी घेईन काळजी. आणि तू पण एकटा नको समजुस तिथे स्वत:ला... माझी इथली कामं झाली कि मी येईन च तुझ्याकडे."
आपले थरथरते ओठ तिने त्याच्या कपाळावर टेकवले...

इतक्यात ताई आल्या आणि तिला आत घेऊन गेल्या... इकडे बाकी सगळी तयारी झालीच होती. Ambulance हलली.

पूर्ती ने इतका वेळ मनाला घातलेला बांध फ़ुटला.... अश्रूंनी निरोप देत होती ती त्याला जो तिला मागे ठेवून पुढे चालला होता...

(पूर्ण काल्पनिक!! ऑफिस मध्ये "sad demise" ची अशीच एक ई-मेल आली नी हे सगळं.... देव असं दु:ख कोणालाही न देवो हीच प्रार्थना!)