Monday, August 28, 2006

Tikaauu chappal

'टिकाऊ चप्पल' हा माझ्यासाठी तूफान विनोदी शद्ब आहे.. अहो खरंच.. जगतली कुठलीहि चप्पल ही टिकाऊ नसते यावर मझा अगदि गाढ विश्वास आहे. आणि हा अंध विश्वास नसून तुम्ही म्हणाल तर मी पुराव्यानिशी ते सिद्ध करू शकते. नंतर तुमचाहि 'टिकाऊ' तल्या फोलपणावर विश्वास बसेल.
अगदी लहानपणि जर मला कोणी विचरलं असतं कि "चप्पल म्हणजे काय?" तर मी अगदी बिनधोक उत्तर दिले असते "जी १-२ महिन्याने तुटते आणि परत शिवून काही फार उपयोग होत नाहे ती म्हणजे चप्पल " यात अतिशयोक्ती वगैरे खरंच नाही... एखादी चप्पल घ्यावी आणि मला ती ६-८ महिने न तूटता टिकावी असं कधीच झालेलं नाही. आई तर वैतागून म्हणत असे "हिच्या पायात कात्र्या आहेत". पण रोज मरे त्याला कोण रडे, त्यामुळे हळूहळू आई च्या हि हे अंगवळणी पडलं. बरं, मी चालण्यात बदल करून बघितला.. म्हणजे हळू चालून झालं, पावले सावकाश टाकून झाली... पण काहि फरक नाही. चप्पल ५० रुपयची घ्या अथवा ५०० ची....माझ्या पायात आल्यवर तिचं भविष्य हे ठरलेलंच त्यामुळेच पुण्यातल्या कुठल्या दुकानात काय range मध्ये चप्पल मिळतील आणि त्या कमीत कमी किती दिवस टिकतील हे मी बर्‍यापैकि अचूक सांगू शकेन. शाळेत असताना तर मी आई ला काहिहि करण देत असे. सायकल चालवते म्हणून किंवा शाळेत उशिर झाल्यवर पळत पळत वर्ग गाठला म्हणून ई. मला एकूणच दर २ महिन्याने असले एखादे कारण तयार ठेवावे लागायचे. एरवीचे जाउदे एक वेळ, पण निदान पावसाळी चप्पल तरी पूर्ण पावसाळाभर टिकावी!!! पन छे!!! बाहेर धो धो पाऊस असावा आणि माझी चप्पल तूटावी हे अगदी ठरलेलं. काहिजण म्हणे पावसाळी चप्पल २-३ सीझन वापरतात... धन्य हो तयांची!!!
लहानपणी दिवाळी, नाताळ आणि उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये चप्पल खरेदि अगदि ठरलेली... मग आधीची चप्पल अगदी १ महिन्या पूर्वी का घेतली असेना... तेव्हाचे ठीक आहे. पण अजूनहि कुठे गावी जायचं, जवळच्या मित्र-मैत्रीणीचं लग्न म्हणलं कि चप्पल खरेदि अटळ असते. या सगळ्या प्रकरामुळे मी कधी एकदम fashionable etc. चप्पल च्या भानगडीत च पडले नाही. न जाणो अगदी पहिल्याच दिवशी तुटून माझी वेगळीच fashion व्हायची मी स्वत: नोकरी करायला लागल्यावर जरा international brand कडे वगैरे वळले... brand च्या नावाखाली अवाजवी किंमत देऊन एक चप्पल घेतली... म्हणलं ही तरी चांगली टिकू दे. पण आले देवाजीच्या मना त्यापुढे काहि चालेना. हि चप्पल इतरांपेक्षा फ़ार तर पंधरा एक दिवस जास्त टिकली असेल. आता हि branded घेण्याचा फायदा एकच ते म्हणजे हे लोक service free देतात. पण माझ्यासारखे अजून ४-५ गिर्‍हाईक मिळाले तर free service देणे ते नक्कि बंद करतील माझ्या मुळे त्यांचा स्वत:च्या quality products बद्दल चा विश्वास नक्कि डळमळीत झाला असणार. एखादी unbreakable वस्तू एकदाच आपटून break व्हावी तसंच काहिसं या branded चप्पलांच्या बाबतीत घडलं. मग म्हणलं जाऊदे... निदान दर वेळी साधारण किंमतीची नवीन चप्पल तरी वापरावी.
मला कुठल्याहि नवीन गावी जावं आणि lodge च्या आधी चांभार शोधावा लागतो. मी फिरलेल्या जवळ जवळ सगळ्या गावतल्या चांभारांची दुकाने मला माहित आहेत. अगदी अलिबाग ते दिल्ली सगळीकडे चांभार शोधणे हा कार्यक्रम काहिशा फरकाने ठरलेलाच!!! त्यामुळे एखाद्याने अमूक अमूक गाव कसं आहे तर मी कधी कधी पटकन सांगते "छान च आहे. सगळ्या रस्त्यांवर चांभार असतात!!!" हिंजवडी मध्ये आल्यावर पण 'तमन्ना' (तमन्ना हे या भागामधलं एकमेव restaurant आहे) च्या आधी मी चांभार गाठला होता
काहि पुर्वानुभवावरून तर हल्ली मी प्रवसात नवीन च चप्पल घेऊन जाते.. म्हणजे निदान लगेच तूटण्याची तरी भिती नसते चप्पल तूटल्यावर चालण हि देखील एक कला आहे. चप्पल तूटली आहे हे न दाखवता चालण्यासाठी तर पाहिजेत जातीचे. अंगठा तूतला तर पायावर जोर देऊन चालवं लागत. इतकं कि अगदि पोटरी मध्ये गोळा येईल... चप्पल ची मधली पट्टी निघाली तर मात्र खरच कसरत असते. यावेळी पाय ओढत चालण्याशिवाय पर्याय नसतो. अशावेळी लोक आपल्याकडे असे काहि विचित्र बघतात.. त्यांना बहुतेक वाटते कि आपल्या पायालाच काहि दुखापत झाली आहे. कधी कधी चप्पल अचानक मगरी प्रमाणे आपला जबडा उघडते... किती अवघड प्रसंग... एकतर आधीच तूटलेली चप्पल... नीट चाललं नाही तर अजून तूटू शकते. पण आता मला या सगळ्यावर काहिना काहि उपाय सापडतोच.. म्हणतात ना 'गरज ही शोधाची जननी आहे'. चप्पल कशी तूटली तर वेळप्रसंगी stapler , सेलो टेप, डिंक ए. गोष्टिंनी ती तात्पुरती कशी दुरूस्त करता येते हे आता बर्‍यापैकि जमायला लागलय. इतके वर्ष नित्यनेमाने चांभारला भेट दिल्यावर हे इतकं जमायल हवंच ना!!!
परवाच मला कोणीतरी सांगत होतं कि तिच्याकडे म्हणे एकावेळी ७-८ प्रकरच्या आणि रंगाच्या चपला असतात. हे असं काहि म्हणजे माझ्यासाठी स्वप्नवत जगणंच आहे. असा shoe rack सजवायला त्या चपला टिकल्या तर पाहिजेत न!!! माझ्या मते तर कुठलीहि चप्पल टिकाऊ नसून २ महिन्याने टाकाऊ च असते लग्नात मुली काहितरी ५-६ साड्या घेतात ना... मी तर विचार करतेय त्या सगळ्यावर १-१ चप्पल हवीच.. ऐनवेळी कुठे धावाधाव करायची!!! आणि होणार्या नवर्‍याला पण सांगून ठेवणार आहे कि दागिने, कपडे हे सगळं राहू दे..पण तेव्हढं per quarter १ चप्पल घेत जा
मला सगळे चांभार हे मला एखाद्या देवाप्रमाणे वाटतात.. चप्पल तुटल्याने होणारी अब्रूची फरपट थांबवणे हे महाभाग च जाणोत. बारा बलुतेदारांमध्ये चांभाराला स्थान देणार्या विद्वानाला माझा कोटीकोटी प्रणाम!!