Thursday, November 23, 2006

मी योगासने करते...

मी योगासने करते...
मागच्या महिन्यापर्यंत मी व्यायाम वगैरे चा फारसा विचार हि केला नव्ह्ता.. हा आता नोकरीच्या आधी उन्हाळ्याच्या सुट्टित अधून मधून सकाळी फिरायला जायचे..पण त्यात व्यायाम हा हेतू कमी आणि मैत्रिणींबरोबर गप्पा च जास्त असायच्या...

तर दिवाळीच्या दरम्यान आई बरीच रागावली म्हणून मी माझे कपाट आवरायला घेतले.. त्यात मला एक माझी १.५ वर्षापूर्वीची जीन्स सापडली... मी ती कशी विसरले होते कोण जाणे.. दुसर्या दिवशी ती घालून बघायच ठरवलं. पण कसलं काय..त्या जीन्स चा साईझ आणि मी यात केन्व्हाच तफावत आली होती... मी हादरलेच... वजन वाढलयं हे कळत होतं पण जीन्स न येण हे म्हणजे अती होतं. काय करावे कळेना... आता नोकरी मुळे सकाळी फिरायला जाणंहि जमणार नव्हतं. काय करावे... काहिहि केले तरी नकळत वाढलेले वजन कमी करणे अत्यावश्यक होतं.

दरम्यान एक मेल आली.... इथे office मध्ये योगासन वर्ग चालू होणार होता.. मी खुष!!! लगेच नाव नोंदवून मोकळी झाले. मनात आलं योगासने शाळेत असताना पी.टी. ला करतच होतो कि...जमेल आपल्याला..पण मी पूर्ण चुकिची होते.

पहिल्या दिवशी ने सांगितले कि BP, heart problem इ. असलेल्या लोकांनी अमूक अमूक आसने करू नयेत. मला त्यातला काहिच त्रास नव्हता... म्हणजे मी सगळी आसने करू शकणार होते.. वा!!! अद्न्यनात किती सुख असतं. योगासने सुरू झाली. पहिले २ दिवस हलक्या फुलक्या आसनांचे होते.. पण त्याने सुद्धा माझे अंग इतके दुखले कि विचारू नका.... बसलं कि उठायला नको वाटायचं आणि उठले बसणे नको!!! म्हणलं सुरूवात आहे...सवय झाली कि कमी होईल.. परत गैरसमज!!!

असे करता करता २ आठवडे झाले... माझेच शरीर मला कि दुरापास्त झाले आहे हे मला एव्हाना कळून चुकलं होतं. शाळेतली पायाचे अंगठे धरण्याची शिक्शा इथे खरोखरच शिक्शा होती... पद्मासन घालताना तर देव आठवत होता. बाकि सगळं लांबच होतं... आमचा मास्तर प्रत्येक प्रकाराचे १५ counts घेतो... माझ्या पाठीला, पायाला ८-१० counts मध्येच अशी रग लागायची कि बास!!! गेल्या २ वर्षात जे जे काहि खाल्लं, ऐश केली त्याच्या प्रत्येक घडिला पश्चात्ताप होत होता... माझी बेफिकिरी च मला नडली होती. आमचा मास्तर मात्र मस्त आहे... त्याच्या शरिरात तर हाड आहे कि नाही अशी शंका यावी इतपत लवचिकता आहे.. तो कुठल्याहि अवस्थेत दोन हात, पाय, नाक, डोक..कात वाट्टेल ते एकमेकाला टेकवू शकते. धन्य आहे...
मी तर सध्या त्याच्या पुढे फक्त हात ठेकवू शकते. पण मी आशावाद टिकवून आहे. निदान ४-५ महिन्याने का होईना मला माझी "पुरानी जीन्स" परत व्यवस्थित घालता येइल याबाबत :)

Wednesday, September 27, 2006

लक्श्मणरेषा..

सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्श्मण यांचे हे अनुवादित आत्मचरित्र. अनुवाद केला आहे अशोक जैन यांनी. आपण साधारण जी चरित्रे वाचतो ती लोकं खूप कष्टातून, झगडून वर आलेली असतात आणि यशस्वी होतात. लक्श्मणांच्या बाबतीत तस.न काहिहि नाहिये. त्यांचे वडिल इंग्रजांच्या काळात एका शाळेचे मुख्यध्यापक होते.. इतरांपेक्शा जरा जास्त सुखी बालपण लक्श्मणांनी उपभोगलं. हातात कला होतीच आणि घरच्या सधन परिस्थितीमुळे चौकटीतल्या क्शेत्रातल्या नोकरीची तशी आवश्यकताहि नव्हती. चित्रकलेतच करियर करायचं असं ठरलेलं होतं. सुरुवातीच्या काळात दिल्ली मध्ये प्रयत्न केले, पण एकूणच ते शहर फारसे भावले नाही तेन्व्हा मुंबई ला आले आणि थोड्या प्रयत्नांती टाईम्स ऒफ इंडिया मध्ये काम मिळाले. त्यानंतर या माणसाने अक्शरश: इतके सुख उपभोगले कि हेवा वाटावा. वृत्तपत्र ऒफिसात स्वतंत्र केबिन असणारा हा भारतातला पहिला व्यंगचित्रकार!!! यू सेड इट ने इतकि अभूतपूर्व लोकप्रियता मिळवली कि बास!!! अतिशय सूक्श्म निरिक्शण शक्ती, राजकिय घडामोडिंचा तटस्थ अभ्यास आणि हातातील जादुई कला याने या माणसाने ५ दशके भारतीय राजकियत्वावर मल्लीनाथी केली. हे काम इतकं मोठं कि याची दखल मगसेसे पुरस्कर्त्यांनी घेतली...हे पुस्तक वाचताना एक मात्र खटकतं...इतर अनेक व्यंगचित्रकारांचा यात उल्लेख आहे पण १-२ अभाव वगळता लक्श्मण कोणाबद्दलहि फारसं चांगले बोलत नाही. प्रत्येकात काहितरी खोट दाखवली आहे. एकूण चैनी, विलासी आयुष्य जगलेला हा माणूस... स्वत:मधल्या काहिशा वेगळ्या कलेमुळे अफाट लोकप्रियता पण अनुभवली... त्यांच्या ५ दशकाच्या मल्लीनाथी ला सलाम!!!
हे पुस्तक एकदा वाचण्यासारखे नक्कि आहे....

Tuesday, September 05, 2006

अनंत चतुर्दशी....

आज अनंत चतुर्दशी!!! गणपती बाप्पा आज परत जाणार.. एरवी अगदी शांत सरळ असलेल्या पुणेकरांमध्ये आजच्या दिवशी एकदम उत्साह दिसतो. ढोल, ताशा, लेझीम याच्या आवाजाने शहर अगदी दणाणून जाते. निरनिराळ्या शाळांची पथक, सुंदर रोषणाई... आजची रात्र पण दिवसापे़आ जास्त जिवंत असते.
पण मला गेले अनेक वर्ष एक प्रश्न पडतो आहे. अनंत चतुर्दशी म्हणजे खर.न तर बाप्पा ला या वर्षी पुरता निरोप द्यायचा दिवस... आपण कितीहि म्हणलं कि पुढच्या वर्षी लवकर या तरी तो यायचा तेव्हाच येणार.. मग निरोपाच्या दिवशी इतकि धामधूम का? ढोल, लेझीम... नाच, गाणी हे तर खरं गणेश चतुर्थी ला पाहिजे ना!!! कारण तो जास्त आनंदाचा दिवस.. बापा आला...आपल्या सगळ्यात दहा दिवस राहणार.. मग असं असताना सार्वजनिक मिरवणूक शेवटच्या दिवशी का?

Monday, September 04, 2006

अर्ध्या तपानंतर...

४ सप्टें २००६... खर्‍या अर्थाने करीयर सुरू करून ६ वर्ष झाली... म्हणजे अर्ध तप.. किती बदल झाले ६ वर्षात? माझ्यात आणि IT क्षेत्रातही...

कँपस मधून जिथे select झाले होते ती कंपनी R&D center असल्याने Pune office बंद करणार होती... मग दुसरी कडे शोधाशोध चालू झाली. freshers साठी out of campus interview हे जरा कठीण काम असतं. जरा एक दिड महिना हातपाय हलवल्यावर एका छोट्या कंपनी मध्ये join झाले... तारीख होती ४ सप्टें २००० त्यावेळी जावा बर्‍यापैकी नवीन होतं आणि microsoft ने IT क्षेत्र काबीज केलेलं होतं. प्रवाहापरमाणे मी पण VC++, COM, DCOM मध्ये काम करू लागले. जाम धमाल यायची. मझ्या lead चे MFC claases तोंडपाठ होते मी आपली MSDN वर च विसंबून होते. MSDN चा किती अधार वाटयचा तेंव्हा. आतासारखे टाक google ला query असा प्रकार तेंव्हा करत नसे मी. आणि google पेक्षाही altavista जास्त वापरत असत लोक. एक तर internet चे पण फ़ारसे प्रस्थ नव्हते.. साहजिकच firewall हा प्रकार हि मोठ्या कंपन्यांपुरता मर्यादित होता.. सुदैवाने अमच्याकाडे firewall नव्हती... सगळ्या web sites open होत्या... काय काय surf करयचो आम्ही... office मध्ये जवळ पास सगळेच जण २२ ते २८-३० च्या मधले... दंगा करायचू खूप. पैसे कमी मिळायचे पण काम करायला मजा यायची. काहिही झालं तरी कंपनी ला शिव्या घालायच्या हा एक कलमी कार्यक्रम असे. त्याशिवाय एकहि दिवस जात नसे . :)

२००० मध्ये करीयर सुरू झाल्याने 9/11 ची मी झळ सोसलेली आहे. IT job market was never that bad before... कल्पनेपेक्षाही भयानक परिणाम सोसले तेंव्हा IT ने. २००१ आणि २००२ हे पूर्णपणे ले ऑफ चे दिवस होते असं म्हणलं तर अतिशयोक्ती होऊ नये. मोठ्या कंपन्या तर सोडाच.. पण माझी कंपनी जिथे आम्ही जेमतेम ४० लोक होतो... तिथे हि ३ बॅच मध्ये ले ऑफ केला गेला. ज्याच्या बरोबर आपण काम केलं त्याला कंपनीने असं हाकलून देताना बघताना खूप त्रास व्हयचा. पण बघत बसण्याशिवाय पर्याय नव्हता. नवीन नोकरी मिळवणे हि तितकेच अवघड होते. आहे ती नोकरी सांभाळने हेच एक आव्हान होऊन बसले होते. US, UK मधून हि लोक परत येत होते. IT चा फुगा जोरात फुटला होता. campus recruitment, increments, onsite opportunities सगळचं मंदावलं होतं. जावा वाल्या लोकांनी खूप वाईट दिवस बघितले या काळात. microsoft वाले फार सुखात होते असं नाही पण त्यातल्या त्यात बरं चालू होतं. गेले ते दिन गेले!!!

२००२ च्या शेवटी job market सुधारायला सुरूवात झाली. काही MNCs नव्याने देशात येऊ लागल्या... २००३ मध्ये IT क्षेत्राने जणू कात च टाकली. दिवस पाळटले. पूर्वीइतकं नाही पण job opportunities वाढल्या. काहि कंपन्या aggresive recruitment करू लागल्या. याच काळात मग मी पण job बदलला... मी जेंव्हा आताच्या freshers ना बोलताना बघते.. तेंव्हा मला इतका बदल जाणवतो... अम्ही करीयर च्या सुरूवातीला कधीच salary, onsite या बाबतीत इतके आग्रही नव्हतो. हसत खेळत काम करणे आणि क.म्पनीला जमेल तेंव्हा आनि तितकं नावे ठेवण.म यातच काय ते आमचं सुख!!! पण त्या नावे ठ्वण्यातहि एक मजा होती. कमी पैशात सुख होतं. आता पैसे जास्त मिळतात पण तशी मजा येत नाही. कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है!!

गेल्या सहा वर्षात IT ने चांगले आणि वाईट दिवस बघितले... यापुढे या क्षेत्राला चांगलेच दिवस बघयला मिळोत... आणि अमचे भले होवो. :)

Monday, August 28, 2006

Tikaauu chappal

'टिकाऊ चप्पल' हा माझ्यासाठी तूफान विनोदी शद्ब आहे.. अहो खरंच.. जगतली कुठलीहि चप्पल ही टिकाऊ नसते यावर मझा अगदि गाढ विश्वास आहे. आणि हा अंध विश्वास नसून तुम्ही म्हणाल तर मी पुराव्यानिशी ते सिद्ध करू शकते. नंतर तुमचाहि 'टिकाऊ' तल्या फोलपणावर विश्वास बसेल.
अगदी लहानपणि जर मला कोणी विचरलं असतं कि "चप्पल म्हणजे काय?" तर मी अगदी बिनधोक उत्तर दिले असते "जी १-२ महिन्याने तुटते आणि परत शिवून काही फार उपयोग होत नाहे ती म्हणजे चप्पल " यात अतिशयोक्ती वगैरे खरंच नाही... एखादी चप्पल घ्यावी आणि मला ती ६-८ महिने न तूटता टिकावी असं कधीच झालेलं नाही. आई तर वैतागून म्हणत असे "हिच्या पायात कात्र्या आहेत". पण रोज मरे त्याला कोण रडे, त्यामुळे हळूहळू आई च्या हि हे अंगवळणी पडलं. बरं, मी चालण्यात बदल करून बघितला.. म्हणजे हळू चालून झालं, पावले सावकाश टाकून झाली... पण काहि फरक नाही. चप्पल ५० रुपयची घ्या अथवा ५०० ची....माझ्या पायात आल्यवर तिचं भविष्य हे ठरलेलंच त्यामुळेच पुण्यातल्या कुठल्या दुकानात काय range मध्ये चप्पल मिळतील आणि त्या कमीत कमी किती दिवस टिकतील हे मी बर्‍यापैकि अचूक सांगू शकेन. शाळेत असताना तर मी आई ला काहिहि करण देत असे. सायकल चालवते म्हणून किंवा शाळेत उशिर झाल्यवर पळत पळत वर्ग गाठला म्हणून ई. मला एकूणच दर २ महिन्याने असले एखादे कारण तयार ठेवावे लागायचे. एरवीचे जाउदे एक वेळ, पण निदान पावसाळी चप्पल तरी पूर्ण पावसाळाभर टिकावी!!! पन छे!!! बाहेर धो धो पाऊस असावा आणि माझी चप्पल तूटावी हे अगदी ठरलेलं. काहिजण म्हणे पावसाळी चप्पल २-३ सीझन वापरतात... धन्य हो तयांची!!!
लहानपणी दिवाळी, नाताळ आणि उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये चप्पल खरेदि अगदि ठरलेली... मग आधीची चप्पल अगदी १ महिन्या पूर्वी का घेतली असेना... तेव्हाचे ठीक आहे. पण अजूनहि कुठे गावी जायचं, जवळच्या मित्र-मैत्रीणीचं लग्न म्हणलं कि चप्पल खरेदि अटळ असते. या सगळ्या प्रकरामुळे मी कधी एकदम fashionable etc. चप्पल च्या भानगडीत च पडले नाही. न जाणो अगदी पहिल्याच दिवशी तुटून माझी वेगळीच fashion व्हायची मी स्वत: नोकरी करायला लागल्यावर जरा international brand कडे वगैरे वळले... brand च्या नावाखाली अवाजवी किंमत देऊन एक चप्पल घेतली... म्हणलं ही तरी चांगली टिकू दे. पण आले देवाजीच्या मना त्यापुढे काहि चालेना. हि चप्पल इतरांपेक्षा फ़ार तर पंधरा एक दिवस जास्त टिकली असेल. आता हि branded घेण्याचा फायदा एकच ते म्हणजे हे लोक service free देतात. पण माझ्यासारखे अजून ४-५ गिर्‍हाईक मिळाले तर free service देणे ते नक्कि बंद करतील माझ्या मुळे त्यांचा स्वत:च्या quality products बद्दल चा विश्वास नक्कि डळमळीत झाला असणार. एखादी unbreakable वस्तू एकदाच आपटून break व्हावी तसंच काहिसं या branded चप्पलांच्या बाबतीत घडलं. मग म्हणलं जाऊदे... निदान दर वेळी साधारण किंमतीची नवीन चप्पल तरी वापरावी.
मला कुठल्याहि नवीन गावी जावं आणि lodge च्या आधी चांभार शोधावा लागतो. मी फिरलेल्या जवळ जवळ सगळ्या गावतल्या चांभारांची दुकाने मला माहित आहेत. अगदी अलिबाग ते दिल्ली सगळीकडे चांभार शोधणे हा कार्यक्रम काहिशा फरकाने ठरलेलाच!!! त्यामुळे एखाद्याने अमूक अमूक गाव कसं आहे तर मी कधी कधी पटकन सांगते "छान च आहे. सगळ्या रस्त्यांवर चांभार असतात!!!" हिंजवडी मध्ये आल्यावर पण 'तमन्ना' (तमन्ना हे या भागामधलं एकमेव restaurant आहे) च्या आधी मी चांभार गाठला होता
काहि पुर्वानुभवावरून तर हल्ली मी प्रवसात नवीन च चप्पल घेऊन जाते.. म्हणजे निदान लगेच तूटण्याची तरी भिती नसते चप्पल तूटल्यावर चालण हि देखील एक कला आहे. चप्पल तूटली आहे हे न दाखवता चालण्यासाठी तर पाहिजेत जातीचे. अंगठा तूतला तर पायावर जोर देऊन चालवं लागत. इतकं कि अगदि पोटरी मध्ये गोळा येईल... चप्पल ची मधली पट्टी निघाली तर मात्र खरच कसरत असते. यावेळी पाय ओढत चालण्याशिवाय पर्याय नसतो. अशावेळी लोक आपल्याकडे असे काहि विचित्र बघतात.. त्यांना बहुतेक वाटते कि आपल्या पायालाच काहि दुखापत झाली आहे. कधी कधी चप्पल अचानक मगरी प्रमाणे आपला जबडा उघडते... किती अवघड प्रसंग... एकतर आधीच तूटलेली चप्पल... नीट चाललं नाही तर अजून तूटू शकते. पण आता मला या सगळ्यावर काहिना काहि उपाय सापडतोच.. म्हणतात ना 'गरज ही शोधाची जननी आहे'. चप्पल कशी तूटली तर वेळप्रसंगी stapler , सेलो टेप, डिंक ए. गोष्टिंनी ती तात्पुरती कशी दुरूस्त करता येते हे आता बर्‍यापैकि जमायला लागलय. इतके वर्ष नित्यनेमाने चांभारला भेट दिल्यावर हे इतकं जमायल हवंच ना!!!
परवाच मला कोणीतरी सांगत होतं कि तिच्याकडे म्हणे एकावेळी ७-८ प्रकरच्या आणि रंगाच्या चपला असतात. हे असं काहि म्हणजे माझ्यासाठी स्वप्नवत जगणंच आहे. असा shoe rack सजवायला त्या चपला टिकल्या तर पाहिजेत न!!! माझ्या मते तर कुठलीहि चप्पल टिकाऊ नसून २ महिन्याने टाकाऊ च असते लग्नात मुली काहितरी ५-६ साड्या घेतात ना... मी तर विचार करतेय त्या सगळ्यावर १-१ चप्पल हवीच.. ऐनवेळी कुठे धावाधाव करायची!!! आणि होणार्या नवर्‍याला पण सांगून ठेवणार आहे कि दागिने, कपडे हे सगळं राहू दे..पण तेव्हढं per quarter १ चप्पल घेत जा
मला सगळे चांभार हे मला एखाद्या देवाप्रमाणे वाटतात.. चप्पल तुटल्याने होणारी अब्रूची फरपट थांबवणे हे महाभाग च जाणोत. बारा बलुतेदारांमध्ये चांभाराला स्थान देणार्या विद्वानाला माझा कोटीकोटी प्रणाम!!