Monday, January 28, 2008

एक लाखात कार



दिल्ली मध्ये Auto Expo त रतन टाटांनी नॅनो launch केली आणि भारतात अजून तरी चैन समजली जाणारी कार देशातल्या गल्लीत पोचली. एक लाख हि आता तशी फ़ारशी मोठी रक्कम राहिलेली नाही. (रिलायन्स पॉवर मध्ये तर कित्येक ’किरकोळ’ गुंतवणुककरांनी एक लाख अडकवले आहेत!) तर अशा एक लाखात आता चारचाकी मिळणार..... ज्याला त्याला वाटू आता कार आपल्या आवाक्यातली वाटू लागली. मला तर नॅनो कार्टून वाले अनेक ई-मेल्स देखील आले.
सगळीकडे १-२ दिवस चर्चा झाली...कि पुण्यात आधीच ट्रॅफिकचे बारा वाजले आहेत त्यात आता नॅनो आली कि तेराच वाजणार!

पण मग मी विचार केला कि खरंच नॅनो इफेक्ट इतका जबरदस्त असणार आहे का?? एक लाखात बेसिक गाडी आहे.... मारुती - ८०० जी १.८० लाखात बेसिक गाडी येते त्याचाच interior भयानक असतं, आत मध्ये शब्दश: पत्रा असतो, dashboard पण यथातथाच! मग एक लाखात टाटा अशी काय जादू घडवून आणून वेगळं काही देणार? बरं इंजिन पण ६०० CC चं...म्हणजे स्पीड नसणारच. बर्याच लोकांचं म्हणणं आहे कि सध्याचा high end bike customer नॅनो घेईल. पण एक तर बाईक आणि नॅनो च्या किमतीत जवळ जवळ १००% चा फरक आहे. शिवाय बाईक घेणारा fuel efficiency ला प्राधान्य देतो. अगदी फॅन्सी बाईक देखील आरामात ४५ कि.मी. प्र. लि. देते...नॅनो जेमतेम २०-२२ देईल. म्हणजे दुप्पट किंमत देऊन ५०% average मिळवा! काय शहाणपणा आहे हा? कार घेणं आणि नियमीत चालवणं यात फ़रक आहेच.
दुसरी गोष्ट म्हणजे पार्किंग... आपल्यापैकी अनेकजणांकडे कार लावायला घराजवळ पुरेशी जागा आहेच असं नाही. दुचाकी कुठेहि फटीत बसू शकते, पण चारचाकीचं काय??
आता राहिले रिक्षावाले. नॅनो हि जवळपास रिक्षाच्याच किंमतीत मिळेल....पण रिक्षा देखील ३० चे average देते. नॅनो २० देईल....या फ़रकामुळे भाडेदर वाढवावा लागेल ज्याने परत रिक्षावाल्यांच्या उत्पन्नात फ़रक पडेल.
नॅनो हा खर्या अर्थाने चांगला पर्याय आहे टॅक्सी ला!मुंबई सारख्या शहरात नॅनो जास्त चालेल. पण परत नॅनो मध्ये डिक्की नसल्याने लांबच्या प्रवासासाठी नॅनो फ़ारशी उपयोगी ठरणार नाही.
म्हणजेच नॅनो मुळे मला नाही वाटत कि सगळीकडे कारच कार होतील...ट्रॅफिकची समस्या अगदी टिपेला जाईल वगैरे...
तुम्हाला काय वाटतं??