Tuesday, September 05, 2006

अनंत चतुर्दशी....

आज अनंत चतुर्दशी!!! गणपती बाप्पा आज परत जाणार.. एरवी अगदी शांत सरळ असलेल्या पुणेकरांमध्ये आजच्या दिवशी एकदम उत्साह दिसतो. ढोल, ताशा, लेझीम याच्या आवाजाने शहर अगदी दणाणून जाते. निरनिराळ्या शाळांची पथक, सुंदर रोषणाई... आजची रात्र पण दिवसापे़आ जास्त जिवंत असते.
पण मला गेले अनेक वर्ष एक प्रश्न पडतो आहे. अनंत चतुर्दशी म्हणजे खर.न तर बाप्पा ला या वर्षी पुरता निरोप द्यायचा दिवस... आपण कितीहि म्हणलं कि पुढच्या वर्षी लवकर या तरी तो यायचा तेव्हाच येणार.. मग निरोपाच्या दिवशी इतकि धामधूम का? ढोल, लेझीम... नाच, गाणी हे तर खरं गणेश चतुर्थी ला पाहिजे ना!!! कारण तो जास्त आनंदाचा दिवस.. बापा आला...आपल्या सगळ्यात दहा दिवस राहणार.. मग असं असताना सार्वजनिक मिरवणूक शेवटच्या दिवशी का?

No comments: