Tuesday, October 30, 2007

वचन

हि कथा साधारण वर्षापूर्वी मायबोलीवर टाकली होती. आज इथे देत आहे
****

रविवार ची सकाळ.. आरामात पॅटिस खात पेपर वाचत होते. इतक्यात फोन ची रिंग वाजली...
"हॅलो"
"स्नेहल, निरंजन बोलतोय.. आज संध्याकाळी काय करत आहेस? मी तुझ्या area मध्ये एक बंगला बघायला येतोय. काहि करत नसशील तर तू हि ये. इतक्या वर्षांनी मला त्या भागात फ़िरायला तुझी मदत लागेल च"
"अजून तरी कहि ठरलं नाहीये माझं. ये संध्याकाळी.. जाऊ आपण"
" gr8 , चल.. मग भेटू ५.३० ला"
" ok , नक्कि "
निरंजन हा माझा कॉलेज मधला मित्र.. माझ्यापेक्षा २ वर्षाने मोठा.. पण कॉलेज चा कट्टा आणि gathering
यामुले एका वर्गात असल्यासारखी मैत्री आमची. इथे १ वर्ष job करून US ला गेला... ते आता एकदम ८
वर्षांनी आला.... दरम्यान येत होता देशात.. पण त्याचे आई बाबा दोघेही नाशिक ला.. त्यामुळे पुण्यात आलाच
नाही... आता "स्वेच्छेने स्वदेश" म्हणल्यावर पुण्यात आला. आणि आता मनासारखं घर शोधतोय..
संध्याकाळी ठरल्याप्रमाणे निर्‍या आला... सोबत निधी (त्याची बायको) आणि प्रणव (दिड वर्षाचा मुलगा).
त्याच्या आवडिची मिसळ तुडूंब खाउन आम्ही तो बंगला बघायला निघालो.
"तुला या जागेबद्दल कळलं कसं रे?"
"अग एका estate agent कडून"
"मग तो नाही आला?"
"म्हणाला कि तुम्ही बघून या आधी.. त्या मालकांच्या बर्‍याच अटी आहेत.. ते सगळं मान्य असेल तर पुढच्या वेळी मी येईन.."
" oic .. को. ब्रा. आहे वाटत मालक" मी निर्‍याला टोमणा मारला. तो "साने" आहे.
"मालक पुणेरी आहे म्हटल्यावर त्याची जात गौण आहे स्नेहल." निर्‍याचे प्रत्युत्तर..
एक दोन डावी उजवी वळणे घेत अम्ही plot no. 502 च्या बंगल्याजवळ पोचलो.
बंगला देखणा, टुमदार.. पण बरेच दिवस कोणी रहात नसल्यासारखा दिसत होता. आम्हाला बघून एक सधारण सत्तरीचे ग्रुहस्थ पुढे आले.
"साने का?"
"हो. गनलांकडून आलोय" (गनला हा estate agent )
"या.. त्यांचा फोन आल होता"

बंगल्यात सुंदर बाग, थोडी हिरवळ होती... निधी चे डोळे तिला जागा आवडल्याच सांगते होते.
मालकांनी प्रणव ला उचलून कडेवर घेतलं आणि आम्हाला आत नेलं.
प्रशस्त हॉल, स्वयंपाकघर, देवघरासाठी थोडी वेगळी जागा आणि १ study , १ बेडरूम अशी खालची रचना होती. तर वर दोन हल्लीच्या मानाने बर्‍याच मोठ्या बेडरूम्स, ३०० sq. feet चं टेरेस होतं.
निर्‍या आणि निधी ला पाहताक्षणी बंगला अवडला. कोणालाहि आवडण्यासारखीच जागा होती.
देव्हार्यात एक गणपतीचा फोटो, study मध्ये १ छोटं शोकेस होतं.. वर एका बेडरूम मध्ये छान लाकडी double bed होता.
"घरी सामान म्हणल तर इतकेच. बाकि सगळे आम्ही जुन्या घरी नेलं"
आम्ही सगले फ़क्त स्मित हसलो.
काकांनी खाली बसायला चटई घातली... आणि थर्मास मधला चहा ते plastic च्या पेल्यात ओतू लागले.
"अहो हे सगळं कशाला"
"मला आवडतं म्हणून. थोडा जास्त च गोड असतो चहा आमचा.. चालेल ना?"
" no problem काका" इति निर्‍या.

"जागा छान आहे तुमची" निधी ने सुरूवात केली. "आणि area पण छान आहे."
"ह्म्म.. " मालकांचा फ़क्त हुंकार.
"आम्हाला आवडली आहे जागा.. पण गनला म्हणत होते कि तुमच्या काही अटी आहेत. त्या कळल्या तर बरं होईल" निर्‍या.
"अटी म्हणण्यापेक्षा आपण त्याला इच्छा म्हणूया. आणि जो माणूस त्या पूर्ण करेल.. त्यालाच मी ही जागा विकेन"
"...." आम्ही सगळे blank .

"असं आहे साने, हा बंगला मि १९९८ साली बांधला... त्यावेळची किंमत आणि आताची बघाल तर जमीन आसमानाचा फरक आहे"
"हो ते आहेच.. किंमतीच्या बाबतीत तुमच्या काय अपेक्षा?"
"तर.. अस फ़रक असूनहि मि हि जागा मूळ किंमतीच्या 30% जास्त घेऊन विकणार आहे.. पण"...
"पण... काहि गोष्टी माझ्या ईछेनुसार होणार असतील तर"
"बोला.." निर्‍या काहिसा वैतागून म्हणाला
"आपण बागेपासून सुरूवात करू. या बागेतली हिरवळ तशीच राहिली पहिजे. बागेत तुळस हवीच.
study मधले शोकस आणि वरचा बेड हे वापरलं नाही तरी मोडीत जणार नाही. तुम्ही इथे कायम तुमच्या आई-वडिलांसोबत रहाल. परदेशी स्थायिक होणार नाही. आणि या बंगल्याचं नाव वचन ठेवाल."
काकांनी एक दमात सगळ्या अटी (इच्छा) सांगितल्या.

"बाग आणि आई बाबांबद्दल ठीक आहे... पण हे नाव आणि परदेशा बद्दल ची अट..." निधी चा प्रश्न.
"सांगतो... मी हि जागा १९७८ साली घेतली. माझा मुलगा, अजित,पाचवीत होता. त्याच्या दहावी नंतर इकडे घर बांधून ययचा विचार होता. पण मला तेंव्हा पैशाची अडचण होती म्हणून जमले नाही. मग तो IIT साठी बाहेर पडला... नंतर MS केलं.. तिकडेच job ही मिळाला.... त्याची बौद्धिक प्रगती होत होती. आणि आम्ही त्यात सुखी होतो. मी आणि माझी बायको दोघेही निवृत्त झालो. हतात एक रकमी बराच पैसा आला. म्हणून मग हा बंगला बांधला. याच बंगल्यात योग्य वेळी त्याचे त्यच्या मनातल्या मुलीशी लग्न करून दिले. घरात लक्ष्मी आली. (लक्ष्मी सून) आमची कर्तव्य आता पार पडली होती. लग्न झल्यावर 3-4 वर्षानी अजित इकडे येणार म्हणला होता. आम्ही त्याच आनंदात होतो. वर्षाआड तो येत होता.. दोनदा आम्ही तिकडे जाउन आलो. पण आता मन थकत चललं होतं. अजित ने आपल्यबरोबर असावं अस वाटायचं. त्याच्याकडे विषय कढला कि नेहमीच टाळाटाळ.. त्याला मुलगी झाली.. म्हनल आता तरी ये. तुमच्या मनाप्रमाणे झाली ना ती US citizen .. मग आता अम्हाला खेळू दे तिच्या बरोबर... परत काहिबाहि उत्तर दिली. नाही म्हणायला.. नातीच्या दुसर्‍या वाढदिवसाला अजित इथे महिनाभर राहून गेला. तेंव्हा त्याच्यासाठी खास तो वरचा बेड करून घेतला.
वाटल.म कि आता एक महिना येतोय तर इथे कयमचा येण्याचा विचर असेल अजित चा." काकांच्या डोळ्यात पाणी...
"पण अजित इथे येउन २ आठवडे झाले आणि एक दिवस त्याने सांगितलं..."
"आई, बाबा मी इथे परत याव असं तुम्हाला वाटतंय मल माहित आहे. पण.. पण मला इथे फरसा scope नाही. शिवाय रुची (अजित ची मुलगी) ला तिथे जितक्या सुविधा मिळतील त्या इथे मिळणार नाहीत. म्हणून आम्ही असा
विचार केलाय कि US मध्येच settle व्हायचं. आणि वर्षातून एकदा येऊ च कि. शिवाय फोन, e-mails आहेतच."
"किती सहज परस्पर ठरवून मोकळा झाला अजित. या सगळ्यात आमचा विचार कुठेच नव्हता. आयुष्याच्या संध्याकाळी फोन वर बोलून का मन रमणार आहे आमचं? आणि हा म्हणतो याला इथे स्कोप नाही? आम्ही अस विचार केला असता तर? याच्या दहवीच्या वेली मला promotion वर आगरतळ्याला बदली मिळत होती. चांगला गलेलठ्ठ पगार मिळणार होता... स्विकरली असती बदली तर हा बंगला तेव्हाच बांधता आला असता. पण याच्या शिक्षणाचा विचार केला आणि बदली नाकारली. याच्या IIT 3rd year laa मला पहिला attack आला.. पण त्याच्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून हिने एकटीने सगळे सहन केलं. आम्हला त्याला खूप शिकवायचं होतं..खूप मोठं झालेल.म बघायचं होतं. पण शिकता शिकता तो स्वार्थी कधी झाला कळलंच नाही." काकांच्या डोळ्यातून दोन मोती ओघळले.
"तुम्ही मुलं खूप शिकता पण शिकल्यावर कसं विसरता रे आई बापाला? त्यांच्या कष्टाचे चीज तुम्ही मिळवलेल्या पैशात नसून उतारवयात त्यांना दिलेल्या आनंदात जास्त असते. आता मझ्यापेक्षा आमचा गवळी नशीबवान वाटतो मला... त्याचा मुलगा सधा M.Com आहे.. पण इथे चांगल्या bank मध्ये नोकरिला आहे... छान लग्न करून आई बाबांसोबत राहतो आहे. पिकल्या पानाला याहून वेगळं सुख काय हवं असतं? आणि आम्ही फार मागतोय का रे? तुमच्या आयुष्याची पहिली १० वर्ष तुमचे हट्ट पुरवले, पुढची १२-१३ वर्षे तुम्हाला मनासारखे शिकू दिले... नंतर नोकरी, लग्न सगळं तुमच्या मनासारख करू दिलं... ३४-३५ वर्ष आयुष्य गेल्यावर जर आई बापाने तुमच्याकडून ४-५ वर्ष सोबत मागितली तर ते चुकलं?? इतकं नाही करू शकत तुम्ही?? कधी कधी वाटतं मुलाला इतकं शिकवलं हेच चुकलं."

"म्हणून मझी अट आहे पोरी आहे परदेशी स्थायिक न होण्याची. आणि तुम्ही मला दिलेलं हे वचन असेल याची
आठवण सतत रहावी म्हणून बंगल्याचं नाव ही वचन ठेवायचं आहे."
"पण मग काका तुम्ही का नाही रहत इथे?" मी
"नाही रहावत इथे. हे घर बांधताना अजित बरोबर राहिल अशी स्वप्न बघितली होती. ते काही आता शक्य नाही. दोघांना इतकी मोठी जागा करायची काय? इतके दिवस विकायचं पण मन होत नव्हतं पण मग विचार केला कि आम्ही गेल्यावर तर काय उपयोग या वास्तूचा? म्हणून मग बंगला विकून ते पैसे इथल्या अंधशाळेला द्यायचे ठरवले आहेत. म्हातरपणी काय करू ५० लाख घेऊन?"

चहाची रिकामे पेले टाकायला काका उठले. आम्ही तिघेही एकदम शांत. निर्‍या परत आला आहे पण परत जायचं
च नाही असं त्याने काही ठरवलं नसावं. काकांच्या बोलण्याने तो अंतर्मुख झाला असावा. काका परत आले.

"साने, नीट विचार करा. या जागेचा नाही, मी काय म्हणतोय त्याचा. "
"काका, मी २ दिवसात काय ते कळवतो तुम्हाला" निर्‍या म्हणला... आणि आम्ही निघालो.

11 comments:

Monsieur K said...

snehal,
i cant find the exact words to express what i felt after reading this.
i started looking inwards for answers to the very same Qs that the old man raised.
parents do so much for us, in return expecting nothing.
and what do we do?
go to US/Europe - earn lots of money - get used to the comfortable/convenient lifestyle - and shrug off our responsibility.
kharach, kiti swaarthi hoto aapan...
i dont want to get personal with anyone - coz each one is entitled to his/her own opinion - many of us bloggers are settled/working abroad - but amongst the multitude of ppl i know - only one of my childhood frnds came back to india on his own will after spending 3-4 yrs in US.
wonder if each one has the guts to shoulder their own responsibility... me included...
:-(

Anonymous said...

hi katha tu maayboli kimva ithech adhi lihili hotis ka? karan nakki vachalyasarakhi watat ahe.

Yogesh said...

changali aahe. pan tu adhi vachali hoti ase vaatate.

अभिजित पेंढारकर said...

छान लिहिल्येस कथा.
पण कथा म्हणावं की ललित लेख?
सत्य घटनेवर आधारित आहे का?

छान फुलवल्येस. विशेषत, त्यातले संवाद.
पण
"हो. गनलांकडून आलोय" (गनला हा estate agent)
हा संदर्भ अनावश्यक आहे.
गनला असो, की टनला! काय संबंध त्याचा या प्रसंगाशी?

काकांच्या डोळ्यातून दोन मोती ओघळले.
म्हातरपणी काय करू ५० लाख घेऊन?"
ही वाक्य झकास.

पुणेरी सान्यानं एकाच दगडात दोन पक्षी मारले.

बाय द वे,
"साने, नीट विचार करा. या जागेचा नाही, मी काय म्हणतोय त्याचा. "
हे वाक्य चुकलंय का?

सानेना उद्देशून कोण म्हणतंय हे??


शेवट पण अर्धवट वाटतो.
थोडासा चटका लावणारा असायला हवा होता.

असो.
पण एकूण परिणाम झकास आहे.
लिहीत राहा.
जमलं आणि तुला आवडलं तर देत राहीन अशाच कॉमेंट्स!!!

कोहम said...

aprateem....khup avadali..

TheKing said...

Liked the end..The open ends answer a lot of questions and sometimes also open the quest of finding answers to the questions you tried to push under the carpet.

Anonymous said...

Apratim

सुभाष इनामदार...culturalpune.blogspot.com said...

Babade,
kiti chahhan lihites.sabhatun dursya dolyasamor yete.
tuzhe vichardhan ajachya pidhila te vurdha zalayvar kaltil.apan sangun upyog nahi.tyanaa te bhavale pahije.

punha asech tachi lehi.

Amol said...

स्नेहल, फार सुंदर लिहिले आहे. हे प्रश्न परदेशात जाणार्‍या सर्वांच्या डोक्यात कायम येत असतील. मलाही साने हे त्या निर्‍याचेच आडनाव आहे हे आधी कळाले नाही, आणि 'घर विकायच्या अटी' वगैरे ऐकल्यावर त्याच माणसाचे आडनाव साने असेल असे आपण गृहीत धरतो :)

"त्यांच्या कष्टाचे चीज तुम्ही मिळवलेल्या पैशात नसून उतारवयात त्यांना दिलेल्या आनंदात जास्त असते" अप्रतिम!

सर्किट said...

सु..रे..ख!

पेंढारकरांनी केलेल्या समीक्षेला नम्र विरोध! कथेतला आशय लक्षात घेणं महत्वाचं - आणि तो तू अफ़ाट ताकदीने वाचकापर्यंत पोहोचवलायेस हे शाबासकीस्पद आहे!

Anonymous said...

khup chan lihile ahes...vachun dolyat pani ale....punyat khup aji ajoba asech ekate rahat ahet...