Sunday, July 08, 2007

वास्तुशास्त्र!!!

Real estate business ने आजकाल इतका सुवर्णकाळ पूर्वी कधी बघितला नसेल.... मागच्या वर्षीचा प्रति चौरस फूट चा भाव आज जवळपास ४०% ने वाढलेला आहे. आणि ठोस कारण काहि नाही. या दरवाढीवर सरकारी/ निमसरकारी कुठल्याच यंत्रणेचा control नाही. कुठल्या भागात जागेचा काय भाव असावा याचे काहि कोष्ट्क नाही. काहि शहरात (जवळपास सगळ्याच), काहि भागात जागेचे भाव असे चढले आहेत कि चांगल्या जागेत राहाणं हा अनेकांचा survival प्रश्न व्हावा!!! असो....यावर बरंच आहे लिहिण्यासारखं...ते नंतर कधीतरी :)

तर या अचानक फुगलेल्या real estate business मध्ये अनेक इतर व्यावसायिक आपली पोळी भाजत आहेत. यात अगदी interior decorator, designer sanitary accessories, सुतार, fabricator.....गेला बाजार अगदी माळी सुद्धा आले. आणि या सगळ्यात गेल्या ४-५ वर्षात अधिक भाव आला तो वास्तुशास्त्र या प्रकाराला!!! म्हणजे हे शास्त्र काहि नवं आहे का हो? नाही...पण लोक अचानक जागृत झाले याबाबत. घर बांधायला सुरूवात झाली किच लोक एखाद्या वास्तुशास्त्र जाणकाराला गाठा....घरातल्या प्रत्येक चौरसाबद्दल त्याचा सल्ला घ्या....त्याप्रमाणे घराच्या मूळ रचनेत अतोनात बदल करा असा सगळा प्रकार चालतो. पूर्वी ज्योतिषकार, पत्रिका बघून तारिखवार भविष्या सांगणे या लोकांची जाम चलती होती. तीच जागा आज या वास्तुशास्त्र वाल्या लोकांनी घेतली वाटतं.

मी नास्तिक नाही....देवावर माझी श्रध्दा आहे. अडचणीच्या वेळी त्याच्यावर हवाला टाकलेला आहे. आणि मी विचार केला त्याहून जास्त सकारात्मक रिझल्ट मला देवाने दिलेला आहे. देवपूजा, स्तोस्त्रपठण इ. मी मानते. या सगळ्याने जी पवित्रता निर्माण होते ती मला आवडते. पण तरीहि मला स्वत:ला देवाधिष्ठीत म्हणवणारे ज्योतिषकार कधीच आवडले नाही. तोच प्रकार या वास्तुशास्त्राचा!!! घराची रचना कशी त्यापेक्षा त्या घरात राहातं कोण यावर त्या घराचं सुख, उन्नती ठरते ना!!! घर म्हणजे पूर्वेकडे दरवाजा, दाराच्या दिशेने laughing buddha कि घर म्हणजे हसतमुखाने स्वागत, अगत्य...कुटंबातल्या लोकांचा एकमेकांवर विश्वास, प्रेम ??? मला वाटतं....businessman जसा काळा पैसा कसा खर्च करू असा विचार करत काहिहि करतो...तसं आज गरजेपेक्षा जास्त मिळणारा पैसा लोक अशा अनैसर्गिक गोष्टीवर खर्च करत असावेत.

या वेडापायी आजकाल काहिहि ऐकायला मिळतं.... दक्षिणमुखी घर नको!!! मला दक्षिणमुखी मारूती माहित आहे.... घर काय प्रकार आहे विचारलं तर कळलं ज्या घराचा दरवाजा दक्षिणेला आहे ते म्हणे दक्षिणमुखी. विचार केला... मी लहानाची मोठी ज्या घरात झाले ते दक्षिणमुखीच होतं. पण आजहि त्या घराइतक्या रम्य आठवणी मला दुसर्या कुठल्याहि जागेच्या नाहीत. माझ्या आई-बाबांनी आम्हा भावंडांबद्दल याच घरात स्वप्ने बघितली...बरीचशी त्याच घरात पूर्ण झाली. आजच्या मानाने पैसे कमी असूनदेखील आताच्या आणि तेव्हाच्या सुख समाधानात फरक असा तो नव्हता!!! एका माणसाने म्हणे घर बांधून पूर्ण झाल्यावर वा.शा. वाल्याला बोलावलं (घर बांधूनहि पैसे शिल्लक राहिले असावेत!!!) तर त्या वा.शा. ने सांगितले कि तुमचे स्वच्छ्तागह चुकिच्या दिशेला आहे. मी चाट च!!! अहो दिवसाचे १५ मिनिटाचे अति महत्वाचे काम त्यात आमच्या पूर्वजांनी देखील दिशेचा विचार केला नाही. आणि "घाईची" लागली कि कुठे दिशा शोधत बसाल??? असो... तर त्या माणसाने toilet काढून पार drainage line बदलून प्रात:विधीसाठीची दिशा बदलली. मी म्हणलं..आता "पूर्वीपेक्षा कमी वेळात आणि जास्ती" होते कि काय? दिशेचा परिणाम म्हणून????

तर यातला विनोदाचा भाग सोडा.... पण वा.शा. हे एक चक्रव्यूह आहे. तुम्ही आत जाता...जातच राहता. बाहेर पडायचा मार्ग ना तुम्हाला दिसतो ना तुम्ही आत राहू शकता. एखादी गोष्ट तुम्हाला करायला सांगितली आणि येनकेन कारणाने ते जमलं नाही तर...मन खातंच राहातं. आणि घर म्हणजे काय हो? वा.शा. प्रमाणे बांधलेल्या घरात जर आई बाबांना जागा नसेल तर कशाला ती वास्तुदेवता प्रसन्न होईल? घर बनतं ते माणसांनी कि योग्य दिशेला योग्य ठेवलेल्या वस्तुंनी??? पैसा आहे म्हणून तो उधळू नका.... तो पैसा मिळवण्याची शक्ती ज्या शिक्षणाने तुम्हा आम्हाला दिली त्याचाच वापर जरा सारासार विचार करण्यात करा. घराची गरज काय..संकल्पना काय हे तपासा.

वा.शा. प्रमाणे घर बांधलेले १००% सुखी आहेत असा पुरावा आहे? जो तो आपलं नशीब घेऊन येतो....प्रत्येकाला चढ उतार आहेतच. आणि चढ सोपा करतील ती तुमची नाती...तुमचे आचार विचार. उतारावर साथ देणारी पण तीच!!! मी रोज वायव्येकडे प्रात:विधी करूनहि मला promotion का मिळत नाही असं का म्हणणार आहात तुम्ही? मग कशासाठी हा अट्टाहास????

वेळीच जागे होऊया..... वा. शा. च्या वाढणाऱ्या स्तोमाला आवर घातलाच पहिजे.

6 comments:

Anamika said...

वास्तूशास्त्राप्रमाणे प्रत्यक्षात घटना घडतात किंवा नाही ते माहीत नाही पण आजच्या युगामध्य्रे प्रत्येक माणसाचे आयुष्य इतके अस्थिर झालेले आहे कि लोक कुठल्याही थोतांडावर विश्वास ठेवायला तयार होतात. पूर्वी लोकांना थोडयाश्या गोष्टींमध्ये समाधान होते पण आजच्या घडीला जास्तीत जास्त मिळवण्याची हाव त्यांना या सगळ्या गोष्टी करायला भाग पाडते.

Yogesh said...

खरं आहे स्नेहल. जगात कुंभार थोडे गाढवे फार. तस्मात कुंभार हो... गाढवांस तोटा नाही कसें...

Devidas Deshpande said...

ज्योतिषशास्त्र किंवा सर्वसामान्य समजुतींप्रमाणे दक्षिण दिशा अशुभ मानली आहे. भारतात तर दक्षिणेकडील राज्येच जास्त पुढारलेली आणि सुंदर आहेत. वास्तुशास्त्र किंवा फेंग शुई ही शुद्ध बनवेगिरी आहे. भारतीय अध्यात्मानुसार, मनुष्याची कर्मेच त्याचे जीवन घडवितात.

Dhananjay said...

Lekh avadala. I didn't know that this problem is growing so fastly. Good analysis.

Dhananjay

Monsieur K said...

i am not aware of how scientific "vaastu-shastra" is - i feel, our forefathers did have some scientific reasoning when they came up with certain rules - the problem happened when people either started following things blindly, or interpreting those rules as per their own convenience.

at the end of it, most people depend on an external factor - a so-called guide or expert, who gives them the confidence that this is the best way to do a thing.

as long as we seek this external support, such people will always continue to thrive.

i completely agree with you in the fact that success & happiness that prevails in a house doesnt depend on how it is built, but more on who lives there.

and yes, even i remember God only when i have an exam, or if i want something desperately from Him :)

~ketan

पूनम छत्रे said...

hmm. stom vaDhalay khara. me ajun ekahi 'vastushastra siddha' ghar pahila nahi. pahila tar gharmalak/ malakinicha interview nakkich ghein :)