Monday, July 23, 2007

अनिल कपूर

"इतक्यात कुठला सिनेमा बघितलास?" माझा एक मित्र मला चॅट वर विचारत होता.
"अरे, मी कमीच बघते. त्यातहि शाहरुख, रानी किंवा प्रीती नसलेले बघायचे म्हणजे चॉईस कमीच ना!!!" मी
"hmmm...." तो नुसताच हंबरला (आणि त्याने हे वाचलं तर मला मारणार आहे ;))
"पण चिनी कम बघितला..आणि आवडला मला. तब्बू आणि इलाय राजा साठी बघितला." मी
"वा!!! मला पण आवडला. तब्बू मस्त च आहे. मला आवडते" इति मित्र.
मग आमचं चॅट एकमेकांच्या आवडत्या actors/ actress वर गेलं. मग कोण छान दिसतं, कुठला सिनेमा छान वगैरे....

"ए, तुला जर chance मिळाला तर कोणाला भेटायला आवडेल?" अचानक मध्येच त्याचा प्रश्न.
"अनिल कपूर!!!!" माझं उत्स्फूर्त उत्तर.
"काय????" तो जरासा चमकलाच..... मग मी त्याला पटवून दिलं कि अनिल कपूर (AK) कसा versatile आहे वगैरे.....

अनिल कपूर.....एक नाव आणि रंग सोडला तर हिंदी चित्रपट्सृष्टीतल्या दिग्गज कपूर लोकांशी दूरान्वयेहि संबंध नाही. पदार्पण साधारण मिथुन, गोविंदा या लोकांच्या काळातलं..... तो एक काळ असा होता कि चांगला सिनेमा दुर्मिळ झाला होता.... ना चांगली कथा, ना गाणी.... नाच देखील भयानक!!! अशा वेळी AK आला.... "वो सात दिन" सारखे हट के सिनेमांमधून. आपल्या गावातून मोठा कलाकार होण्यासाठी बाहेर पडलेला तरूण लाजवाब आहे. चेहऱ्यावरची निरागसता, मनाचा सच्चेपणा सगळं छान जमलंय. मी हा सिनेमा खूप नंतर बघितला...(साहजिक आहे...सिनेमा आला तेव्हा मला मराठी जेमतेम कळायचं...हिंदि काय कप्पाळ कळणार?). पण जेव्हा बघितला तेव्हा AK जबरी आवडला.
AK ने एक से एक सुंदर आणि त्याहून महत्तवाचं म्हणजे variety movies केले.....तुम्ही म्हणाल ते तर आमिर ने पण केले. पण फ़रक आहे. आमिर ने variety इथे industry मध्ये settle झाल्यावर दिली....AK ने अगदी सुरूवातीपासून केलं. त्याचा कर्मा, मशाल, साहेब, मेरी जंग वगैरे आठवा..... कुठेच तो गुलफाम चेहऱ्याचा, हिरोईन च्या ओढणीशी खेळणारा नाही आहे. कर्मा मधला रोल तसा लहान...पण लक्षात राहतोच. साहेब मधला बहिणीच्या लग्नासाठी किडनी विकणारा भाऊ मन हेलावून सोडतो. मेरी जंग.....यातल्या performance बद्दल मी काय लिहू??? गिरिश कर्नाड, नूतन सारखे मोठे कलावंत....त्यांचा मुलगा AK... वडिलांचा खून होतो...त्या धक्क्याने आई वेडी होते....त्या सगळ्यातून स्वत:ला आणि लहान बहिणीला AK सावरतो...आई ला धक्क्यातून बाहेर काढतो. कथा अपेक्षित धाटणीची...पण AK rocks!!! त्याच्या ईश्वर पण असाच हट के सिनेमा...पण यातला कुठलाच सिनेमा सुपर डुपर हिट ठरला नाही. ते यश AK ला मि. इंडिया ने दिलं.
मला अजूनहि आठवतंय तो सिनेमा आला तेव्हा जवळ जवळ माझ्या सगळ्या मित्र मैत्रिणींनी तो थिएटर मध्ये जाऊन बघितला होता. जुन्या ब्रह्मचारी ची कथा घेऊन बोनी कपूर ने हा सिनेमा काढला.... एका अद्भुत घड्याळाने AK व्हिलन लोकांचा धुव्वा उडवतो... १५-२० अनाथ मुलांना जीवापाड प्रेम देतो.....आत्ता जी पिढी २५-३२/३३ मध्ये आहे..त्या सगळ्यांना हा सिनेमा तेव्हा जबरी आवडला असणार. कित्येक आठवडे या सिनेमाने यश चाखलं.....आणि हे यश पूर्ण बोनी आणि अनिल चं आहे.
इथून पुढे AK चमकू लागला..... तेजाब, राम लखन, बेटा, खेल वगैरे माधुरी बरोबर च सिनेमे.... सगळेच चांगले आहेत असं नाहिये..पण तो चमकत होता हे मात्र मान्य करायलाच हवं.
लम्हे पण एक सुंदर सिनेमा!!! (फक्त त्याने मिशी काढायला नको होती) याच दम्यान त्याचा आवडलेला आणि लक्षात राहिलेला सिनेमा म्हणजे परिंदा... परत एकदा माधुरी! खूप दिवसांनी भेटणाऱ्या मित्राचा खून प्रत्यक्ष डोळ्याने बघितला.....खून ज्याने केला त्याच्याकडे भाऊ काम करतो.....ज्याचा खून झाला तो परम मित्र आणि त्याची बहिण प्रेयसी...... AK चा पूर्ण emotional performance!!! (यातला नानाचा अण्णा पण मस्त!!!)
मध्ये बराच काळ AK गायब होता..... इकडे शाहरुख, अक्षय टाईप नवीन लोक येत होते. AK त्यावेळी होमवर्क करत असावा.
आणि मग तो परत आला.....१९४२...., नायक, विरासत, पुकार, ताल, कलकत्ता मेल, murder असे वेगळे सिनेमा घेऊन. नायक जरा जास्त च फिल्मी आहे पण AK साहजिकच भाव खाऊन जातो. विरासत.....मला अजून असा माणूस भेटला नाहिये ज्याला हा सिनेमा अजिबात आवडला नाहिये. Virasat is a same old but well described and well potrayed story!!! US return अनिल आणि वडिल गेल्यावर त्यांची गादी चालवणारा अनिल....दोन्हि आवडतात. ठाकूर झालेला अनिल अप्रतिम दिसतो. तब्बु वर प्रेम करणारा अनिल हळवा वाटतो.....all in all....विरासत मध्ये AK ची ताकद पुन्हा एकदा दिसून येते. ताल मधला practical अनिल भावुक अक्षयपेक्षा जास्त जवळचा वाटतो. या सिनेमातले त्याचे संवाद आणि संवाद्फेक दोन्हि नेहमीपेक्षा वेगळी आहे. सिनेमाच्या शेवटी मला वाटलं होतं कि, ऎश्वर्या का याला सोडून अक्षय कडे जातेय?
बिवी नं. १, No entry मध्येहि इतर कोणापेक्षाहि AK अधिक स्पष्ट लक्षात राहतो. अरमान हा पण त्याचा अजून एक वेगळा सिनेमा!! दीवाना मस्ताना मध्ये गोविंदा बरोबर केलेली धमाल मजा देऊन जाते.
AK ने काहि अगदीच बोअर सिनेमे पण केले....जसे लाडला, रूप कि रानी..., जुदाई वगैरे. पण त्याचा overall graph बघता असे खूप कमी सिनेमा आहेत. ८०% वेळा AK ने वेगळं दिलं आहे....वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा करियर स्पॅन तर नुसत्या पद्मिनी कोल्हापुरे ते बिपाशा यावरून च ओळ्खावा. आणि या इतक्या प्रचंड काळात जपलेली स्वच्छ प्रतिमा. AK हा खून हॅंडसम, चिकणा आहे असं माझ्या एका मैत्रिणी ने प्रत्यक्ष बघितल्यावर सांगितलं आहे. असं असून त्याचं नाव कोणाबरोबर घेतलं गेलं नाही. जिच्याशी लग्न केलं तिच्याच बरोबर अजून हि आहे. (आमिरने इथे मार खाल्ला..)
खरं सांगायचं तर अनेक आत्ताच्या किंवा त्याच्या काळ्च्या कोणापेक्षाहि AK सरस आहे. आज हि मला AK चा सिनेमा म्हणलं कि काहि वेगळं असेल याची खात्री असते.... त्याची मुलगी आता १७-१८ वर्षांची आहे म्हणे....
ती जर वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सिनेमात येणार असेल तर AK ने अशीच variety करण्याची समज दिला पण द्यावी!!!
AK..... कोणी मानो वा ना मानो...पर तुस्सी ग्रेट हो!!!

5 comments:

Monsieur K said...

Snehal,
tu solid-ch AK fan disat aahes. kevadhe details maahit aahet tulaa!
as a kid, he was my favorite hero.
Mr India mojun 8-9 velaa paahilela :D
Ram-Lakhan madhli tyaachi "1, 2 ka 4" step theater madhun baher padlyaa-padlyaa rastyaat keleli :D
Anil-Madhuri hee tyaa vel chi favorite jodi - tyaance Tezaab, Beta, Jeevan Ek Sanghursh, Khel.. sagle-sagle theatre madhe jaaun paahilele :D

pan nantar motha hoto, tevha shinga phut-taat tasa jhaala maajha. AK pekshaa Aamir jaasti aavadu laagalaa.
infact, today other than Amitabh i dont think i would go for a movie just for the sake of the hero.
and these days, even Amitabh doesnt necessarily guarantee that :(

anyways, mast lihila aahes!
aani anil bhai chyaa mishi-baddal pan thoda lihaaycha naa!
maybe his different moustache-n-beard styles deserves another post ;-)

Anonymous said...

पोस्ट फारच आवडली. सर्वप्रथम "त्यातहि शाहरुख, रानी किंवा प्रीती नसलेले बघायचे म्हणजे चॉईस कमीच ना!!!" या वाक्याबद्दल १०० मार्क्स.
AK मलाही बराच आवडतो. एक तर त्याची मिशी! मला वाटतं, बॉलीवुडमधे मिशी खर्‍या अर्थाने शोभून दिसणारा नायक एकच, आणि तो म्हणजे AK. दुसरं म्हणजे त्याचं ते हसू! मिश्किल! तिसरं म्हणजे टिपिकल चाळकरी, रांगडा अभिनय!
मिस्टर इंडिया, विरासत, राम लखन, नायक हे चित्रपट अगणितवेळा पाहिले आहेत. अगदी 'हम आपके दिलमे रहते है' सारखे चित्रपट सुद्धा २-३दा पाहिले आहेत. अर्थात सगळे पाहिलेले नाहीत. एकुणात मला AK आवडतो. पण त्यांच्या चित्रपटांमुळे तो आवडत नाही. त्याच्यामुळे त्याचे चित्रपट आवडतात. :)
आमिर खान मला आधी खरंच खूप आवडायचा. पण रंग दे बसंती नंतर गरज नसताना तो 'नर्मदा बचाव' आंदोलनात जो गेला, ज्या आवेशात त्याने मुलाखती दिल्या, आणि मग ज्या प्रकारे बाहेर पडला, त्या सर्व गोष्टींनी मनातून उतरलाच एकदम! :(

Devidas Deshpande said...

अनिल कपूरला त्याच्या दीर्घ कारकिर्दीबद्दल मानलेच पाहिजे. अभिनयातही तो तसूभरही कमी नाही. ज्याप्रकारे सामान्य व्यक्तिंच्या भूमिका तो करतो, त्यामुळे अनेकांना तो आवडतो. माझ्या दृष्टीने अनिलचे महत्व एवढेच, की त्याचे बहुतांश चित्रपट दक्षिणेच्या चित्रपटांचे रिमेक आहेत. त्याचा पहिला चित्रपटही कन्नड होता आणि हिंदीतील पहिला चित्रपट ‘वो सात दिन’ही तमिळमधील ’अन्द एळु नाळ’चा रिमेक होता. बाकी तुम्ही लिहिलय छान!

Vaidehi Bhave said...

अनिल कपूर मलासुद्धा खुप आवडतो. त्याने नेहमी वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत..त्याचा मला जास्त आवडलेला सिनेमा म्हणजे "नायक"...
महत्त्वाचे म्हणजे तू इतक्या डीपली त्याच्या अत्तापर्यन्तच्या कारकिर्दीची माहिती ठेवली आहेस...यावरूनच तू AK ची खूप मोठी Fan आहेस हे दिसून येते.

Tejaswini Lele said...

anil kapoorchi itki mothi fan mi pahilyandach baghatye!!
chhan lihilays!!