Friday, June 08, 2007

परिपक्वता...

साधारण सहा महिन्यापूर्वीची गोष्ट आहे.... आईने मला विचारलं "तुला सांगली ला जायला जमेल का या गुरूवारी?"
"का गं? एकदम सांगली??"
"लग्न आहे ’तिचं’ "
"अरे वा!!! मजा आहे. अगं पण असं अचानक अवघड आहे जमणं.... कधी ठरलं लग्न?"
"बरेच दिवस झाले.... बरंच समजावून झालं, रडून झालं...पण ती ऐकत नाही म्हणून मग आई बाबांनी करून द्यायचं ठरवलं"
मग या नंतर आईने मला स्टोरी जरा डिटेल मध्ये सांगितली.
’ती’ माझी एक लांबची मावसबहिण. लहानपणापासून हुषार...हुषार म्हणून आधीच हौशी असलेल्या आई बाबांनी जास्तच लाडात वाढवलेली. तिचा दहावी, बारावी चा निकाल म्हणजे ९० च्या पुढे किती हेच कळायचं बाकि असायचं...तिथेपर्यंत ती जाणार याची खात्रीच!!! मग इतर ४ हुषार पण ठरलेल्या वाटेने जाणाऱ्यांप्रमाणे तिनेहि Computer Engineer व्हायचं ठरवलं.
करता करता ३ वर्ष पार पडली. चवथे सुरू होताच campus drive चालू झाला. एखाद दुसरी कंपनी निसटली असेल..आणि तिचं एका मोठ्या कंपनीत सिलेक्शन झालं. वा!!! परत अपेक्षित कौतुकाचा वर्षाव. लठ्ठ पगार, पुण्यात नोकरी..... सगळेच जणू हरखून गेले होते. शेवटचं वर्षहि झालं.....ती पुण्यात आली. कदाचित खूप स्वप्न उराशी घेऊन.....
काळजी घे, वेळेत खात-पित जा.....वगैरे सूचना आई बाबांनी दिल्याच. पैशाची काळजी करू नकोस......वगैरे पण होतंच. या सगळ्यात एकच सांगायचं राहिल..."आम्हाला काळजी वाटेल असं काहि वागू नकोस"
तिचं आता स्वतंत्र आयुष्य सुरू झालं..... कोषातलं फुलपाखरू जणू बागेत अचानक सोडलं गेलं. नवीन कंपनी, नवीन वातावरण......सगळच मखमली, गुलाबी!!! आमच्यासारखे काहि नातेवाईक होतेच पुण्यात....पण तिने नेहमीच येणं-जाणं टाळ्लं. दिवसातले ११-१२ तास तर कंपनीतच जात होते....आर्थिक स्वयंपूर्णता हि होती.
अशा वेळी मोहाचे क्षण म्हणजे जणू तुमची सावली असतात. २२-२३ चं वय.... मित्र मैत्रीणींचा गराडा. इतके दिवस निर्णयात आई बाबा असतात...आता सगळं स्वत:च ठरवायचं. thrilling वाट्तं सगळंच. आपण चुकू असं चुकूनहि मनात येत नसावं. कारण तसा विचार करण्याची शक्ती च मिळाली नाहि कधी!!!
पुढचं एखादा चित्रपट वाटावा इतकं साहजिक आहे...... ती एका मुलाच्या प्रेमात पडली....तो पण. तो हरियाना मधल्या कुठल्या तरी गावातला. तो पण हुषार..... गुलाबी रंग अजूनच गडद झाला, मखमल अजूनच मऊ!!! तिने घरी सांगितलं... कडाडून विरोध ठरलेला..... एकदा, दोनदा....अनेकदा........ शेवटी आई बाबांनी लग्न करून द्यायचं ठरवलं. ती अशी का वागतेय किंवा ते का इतका विरोध करताहेत हे दोघांनीहि विचारात घेतलं नाही. "आमची इतकि हुषार मुलगी अशी वागेल असं वाटलं नव्हतं" असं ते म्हणतात. "मला सगळं देणारे आई बाबा लग्नाला का विरोध करताहेत" असं ती म्हणते. गैरसमजाची भिंत.... कोणी तोडतच नाहिये...कि त्यांना ती दिसतच नाहिये???
थोड्याशा अनिच्छेनेच लग्न पार पडलं. वाटलं झालं सगळं सुरळित........ पण कहानी का climax अभी बाकि है!!!
राजा राणीचं नवीन आयुष्य सुरू झालं. प्रेमात पडले, घरच्यांचा विरोध पत्करून लग्न केलं.... पण लग्नातली जबाबदारी, घ्यायची खबरदारी न यांनी विचारात घेतली ना यांच्या आई बाबांनी.
नोकरी, घर याच्यात ती गुंतून गेली.....त्याचं MBA करायचं आधीच ठरलं होतं, तो त्यामागे होता. लग्नाच्या ३ च महिन्यांनी दोघांना कळलं कि ते आता आई बाबा होणार आहेत!!! या गोष्टिला मानसिक तयारीच नाही...... त्याला MBA करायचं आहे....आणि तो शिकणार म्हणून तिला नोकरी गरजेची आहे. आता काय?? काहि नाही...... show must go on!!!
हे सगळं ऐकून मावशीला त्रास झाला.... साहजिक आहे. काल्पर्यंतची मुलगी, उद्या आई होणार...या नाजूक अवस्थेत नवरा सोबत नसणार (तो परगावी असणार). "काय हि गडबड? इतके शिकलेले लोक...असं कसं करतात?" हे आणि वर सगळ्या मोठ्या लोकांचं मत.....
पण मी म्हणते सगळी चूक त्यांचीच आहे????? पालक, मोठे म्हणून तुम्ही काहिच चुकला नाहि??? मुलीला (मुलाला देखील) शिकायला, नोकरीसाठी बाहेर पाठवताना काहि गोष्टिंची कल्पना आई बाबांनी द्यायला हवी. बाहेर काय प्रलोभनं असतात, चार लोकांमध्ये चांगला माणूस कसा ऒळखावा वगैरे. सतत आई बाबांजवळ राहिल्याने विचारशक्तीला खूप मर्यादा आलेल्या असतात..... बाहेर पडल्यावर आपली आपण चौकट ठरवायची आणि पाळायची असते. पण हे कोणीतरी सांगायला हवं होतं ना? आजकाल च्या जगात निर्णय मुलांनीच(अपत्य) घ्यायचा आहे, पण तो निर्णय बरोबर घेण्याची क्षमता आई बाबा म्हणून तुम्ही द्यायला हवी ना? तिचा त्याच्याशी लग्न करायचा निर्णय बरोबर असेल (कारण तो शिक्षण, नोकरी वगैरे दृष्टिने योग्य आहे) पण मग आता जी जबाबदारी तिला एकटिला पेलावी लागेल(त्याचं MBA होईपर्यंत) त्याचं काय? मुलीचं लग्न म्हणलं कि साड्या, दागिने, हळवं होणं इतकंच......कि त्यापुढे जाऊन तिला काहि महत्त्वाच्या गोष्टि सांगायला हव्यात??? आपल्या देशात अजून तरी सांगायलाच हव्यात. निदान २२-२५ या वयापर्यंत तरी!!!
खूप शिकलेले लोक याबाबतीत चुकतात....सरळ आहे. आपलं शिक्षण आपल्याला तांत्रिकदृष्ट्या परिपक्व बनवतं...... पण मानसिक परिपक्वता कुठलंच लौकिक शिक्षण देत नाही. तिथे महत्त्वाचे ठरतं upbringing, आई बाबा नी तुम्ही एक चांगली व्यक्ती व्हावं म्हणून घेतलेले कष्ट....संस्कार......तुमची जगाकडे बघण्याची आणि आकलन करण्याची शक्ती. या सगळ्यात पालकांचा वाटा खूप मोठा आहे. निर्णय पुढच्या पिढिलाच घेऊदेत...पण तुम्ही त्यांना योग्य निर्णय घेण्याची परिपक्वता द्या. त्याने तुमचा उतार वयातील त्रास नि पुढच्या पिढिचा तरूणाईतला मनस्ताप नक्किच कमी होईल.

9 comments:

A woman from India said...

अगदी बरोबर आहे. तरूण मुलांशी संवाद साधण्यासाठी पालकांनी त्यांच्याशी मैत्रीची नाते प्रस्थापित करणे आवश्यक असते. शिवाय अपत्याने निवडा केलेली व्यक्ति केवळ परप्रांतिय/जातीच्या बाहेरची आहे म्हणून विरोध करणे योग्य नाही. इतर मुद्दे - सामंजस्य, स्वभाव मिळणे या बाबी जास्तं महत्वाच्या असतात

Vidya Bhutkar said...

दूर कशाला, मलाही आई-बाबांशी बराच संघर्ष करावा लागला या बाबतीत.अगदी माझेही नातेवाईक पुण्यात होते ज्यांना भेटणं मी टाळायचे(लोक प्रेमात काहीही करतात :-) ). आणि मला हे पटलं की अशा प्रसंगात कुणीच सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करत नाही, होतात ते फक्त वाद. मान्य की आई-बाबांनी शिकवावं, समज द्यावी.आणि हे ही मान्य की आपल्या इथे लैंगिक शिक्षणाचीही कमतरता आहे.
पण मला असं वाटतं की आपल्या निर्णयांबद्दल केवळ जो-तो जबाबदार असतो.विशेषत: व्यावसायिक शिक्षण घेतलेले, नोकरी करणारे लोक तर नक्कीच. एखादी १८ वर्षाची मुलगी म्हणाली की असं झालंय तर ते कदाचित एकवेळ समजता येईल पण निर्णयस्वातंत्र्य मिळालेल्या व्यक्तिंनी अशी चूक केल्यास ते स्वत: जबाबदार आहेत असं मला वाटतं.
-विद्या.

Monsieur K said...

Snehal,
You really seem to keep me guessing what your next post will be. At times, it is absolutely hilarious stuff, and then there are times likes this one when you touch some really sensitive/serious issues. And you handle both of these with equal ease.

Coming back to this post - yes, it is indeed parents who are 'responsible' in bringing up the child - they imbibe a certain set of values, ingrain the thinking pattern, offer freedom of thought and action as the child grows up.
Unfortunately, the scale/parameter used to judge how good parents are, or how good the child is - is the scale of class 10, 12, graduation marks and what kind of job the child/person secures.
It is an implicit assumption that a child with the highest marks has the best set of values - he/she may indeed have those - but then as you correctly point out - the 'young'/'imaature' age of 22-23 accompanied by financial & social independence may affect the person to lose his/her way.
I would say that at this point, the blame lies entirely with the child/person and not the parents - they have done a wonderful job in bringing up their kid to the best of their abilities. Yes, they may offer advice and help, but that may not be taken in the best spirit by the child.
I have to agree with what Vidya says above.

Once again, well written :)
~Ketan

कोहम said...

snehal,

poornapane patale nahi. paripakvata deta yete asa mala vatat nahi. ti ghyavi lagate asa vatata. atishay vait paristhititun vait sanskaratun var alele lokahi asatata ani atishay changlaya ucchabhru gharat bighadalele lokahi asatat. arthat palakanni changale sanskar karu nayet asa nahi. pan palyanni svatahachya aparipakvatechi jababadari palakanvar takana chukicha aahe asa vatata.

स्नेहल said...

even I agree with all of u.... but then just blaming 'her' is what I can not stand for.
Decision making is a skill.... and one needs grooming for it. That is why we have so many management schools, right??? Who will teach us abt decisions one shd make/take in personal life? Obvious answer for this at present in India is one's parents and family members. Isn't???

Pranav_Kulkarni said...

स्नेहल, निर्णय घ्यायला कोण शिकवणार हा प्रश्र्नच त्या निर्णयाच्या परिणामची जबाबदारी झटकण्याच्या मानसिकतेतुन येत असतो. पण जरा त्याच्या पलिकडे जाऊन या जबाबदारी टाळण्याच्या उगमाचा शोध घेतला तर असे लक्षात येते कि पालकांनी निर्माण केलेले वातावरण फारच "wrongly" result oriented असते. म्हणजे पालकांचा अपेक्षाभंग हा मुलांच्यात फक्त अपराधीपणाच आणेल असे त्यांचे वागणे! या ऐवजी पालकांनी आपल्या मुलाची नैसर्गिक आवड आणि गती शोधण्यासाठी त्याला मदत केली तर त्यांच्यासंबधात एक प्रकारचा मोकळेपणा येईल आणि विश्वासाचे नाते तयार होईल. रहाता राहिला प्रश्र्न लैंगिकशिक्षणाबद्दल, मला वाटते पालकांनी याचा बाऊ न करता नैसर्गिकरितीने याला समोरे जात पाल्याला आपली "लैंगिकता" शोधण्यास मदत करावी. त्यामुळेसुद्धा ब-याच समस्या अटोक्यात येण्याची शक्यता आहे.

पहिल्यांदा लिहायचे ते शेवटी लिहीतो, आपला प्रयत्न छान होता.

Yogesh said...

Snehal, konatahi nirnay ghetana to apan swatach ghet asato. Mag tya nirnayatale yash apayash he apalach asatah.

तिने घरी सांगितलं... कडाडून विरोध ठरलेला..... एकदा, दोनदा....अनेकदा........ शेवटी आई बाबांनी लग्न करून द्यायचं ठरवलं.

yaa vakyatun tichya aai babanni prayatna kelech ahet asa disata na.

said...

तुमचे बरेच ब्लॉग्स वाचले, आणि आवडलेही. पुढील लिखाणासाठी शुभेच्छा..!

Dr. Prasad S. Burange said...

This blog represents a real socio-cultural problem. I think showing and letting kids experience various major facets of life is important for both kids and the society. Forcing ideas on kids won't solve this problem. I live in America since 2003 and experienced both cultures very closely. Here youths leave their parents home after 18 to explore the world. However, this isn't the case in India. One must use its LOGIC, COMMON SENSE, and the previous experience to combat future problems. So parents must raise & prepare their kids emotionally in such a way that they are ready to face the outside world and be able to take their own decisions. No Pain, No Gain! I am lucky enough that my parents brought me well. So everybody has some contribution in such real life sitution. There is no escape. Mistakes could be fixed based on the mutual consensus. Easy come, Easy go!