Monday, April 16, 2007

पाऊस

ऊन्हाळा सुरू झाला.... बघता बघता पारा ४० अंशापर्यंत गेला.... संध्याकाळी घरी जातानापण रस्त्यावरच्या गरम वाफा नको वाटतात. मग असंच एका रविवारी आभाळ दाटून येतं...उकाडा जास्तच जाणवू लागतो. अचानक जोराचं वारं वाहू लागतं...वाटतं, आता हे ढग पळून जाणार. शिशिर ऋतुमुळे घराच्या मागच्या औदुंबराची पाने गळायलाच आलेली....अशातच या वाऱ्याने ती एकदम गळू लागली. वा!!! एखाद्या सिनेमात बघावं तसं दिसतंय अगदी.....वारा जरा कमी होतॊ...एक थेंब, दोन, तीन...पाऊस पडायला लागला. ऊन्हाने तापलेल्या मातीवर पाणी, त्या मातीचा तो सुवास...खॊल श्वास घेऊन मी तो मनात साठवते. अजून रस्ता ओला झाला नाही इतक्यात दिवे जातात... मी हातातलं पुस्तक (पानिपत) बंद करून खिडकीतून पाऊस बघत बसते.... पाण्याचे ते टपोरे थेंब, आमच्या बागेतली सगळी झाडे स्वच्छ धुवून निघतात. पावसाचा जोर कमी होतो.. कोकिळा ऒरडतेय. पाऊस थांबला...अरे वा!!! दिवे पण आले. मी वर्ल्ड कपची मॅच बघायला लागते. आता मला कोण जिंकतंय/ हारतंय याने काहिच फरक पडत नाही.... बाकि काहि बघण्यासारखं नाही म्हणून खरं तर मी मॅच लावली आहे.
आज परत सोमवार....नवीन आठवडा चालू....आणि हो, चालू कंपनीमधला शेवटचा आठवडा!!! या आठवड्यात काम तसं काहिच नाही (आधी होतं असंहि नाही :))... दिवसभर टंगळमंगळ करते.... बाहेर काय चालू आहे हे मला माझ्या क्युबिकल मध्ये बसून काहिच कळत नाही. सहा वाजले..... मी घरी जायला उठते.... अरे....आजपण पाऊस!!! बरं झालं, आज लखनवी नाहि घातला. उगाच खराब झाला असता. शी!!! किती बोर विचार करतेय मी धुंद पावसात. सगळी लॉन एकदम टवटवीत दिसतेय... रोजचाच हा कॅंपस पावसात मस्तच दिसतो.... पाठीमागे वळून एकदा तो २५ एकर परिसर पाण्यात न्हाताना बघते. युन्हिवर्सिटी नंतर मला फक्त याच कॅंपसने मोहिनी घातली. आणि हि मोहिनी पावसात जास्तच गहिरी होते.
एखाद्या यंत्राप्रमाणे मी बसमध्ये जाऊन बसते. वा!!! आज खिडकीची जागा :) उपरवाला कुछ तो मेहेरबान है गरीब पे। mp3 player काढला....या वातावरणात मला अजून वेडं करणारं गाणं चालू आहे...
"तू हि मेरी शब है, सुबह है...तू हि मेरी लम्हा
तू हि मेरा रब है खुदा है...तू हि मेरी दुनिया"

माझ्या आयुष्यात कधी येणार असा माणूस? असा पाऊस असावा.... काहिहि न ठरवता त्याने मला ऑफिसमध्ये पिक-अप करायला यावं... कार नको, बाईक च!!! रिमझिम पावसाचे थेंब मला भिजवताहेत....पण त्याहून जास्त मी त्याच्या मनकवड्या प्रेमाने भिजतेय. पावसाचा जोर वाढतो...तसं आम्ही जवळच्या भजी-चहा च्या गाडिजवळ थांबतो.... मस्त वाफाळता चहा!!! इतक्यात कोणी त्याच्या ओळखीचं दिसतं....मस्त जोरात शिट्टी मारून तो त्या मित्राला हात करतो. (हो, त्याला खणखणीत शिट्टी वाजवता यायलाच हवी) पाऊस जवळ जवळ थांबला....गार वारा सुटलाय. त्याबरोबर उडणारे माझे केस मी बांधयला बघते...."राहू दे गं....असेच छान दिसतात"
बाईकला किक मारून आम्ही पुढे जायला निघतो.

कित्येक पावसाळे कोरडे गेले नि कित्येक जाणार आहेत माहित नाही..... दर वर्षी बाहेर पडणारा पाऊस मला आतल्याआत अजून अजून कोरडा करत जातो. काहितरी नसल्याची तीव्र जाणिव करून देत पाऊस पडत राहतो..... एकाजागी शांत बसून मी तो नुसता बघत असते.... कदाचित असा एकटिने अनुभवायचा हा शेवटचा पाऊस असा विचार करत, पुढच्या वेळी माझ्या शेजारी बसून पाऊस बघायला तो असेल. त्याचं जवळ असणंच मला धुंद करणारं असेल..... पावसाच्या एका एका थेंबातून प्रेमाचा कणनकण विरघळत जाईल.

11 comments:

abhijit said...

सहीच की गं. च्याय्ला मुलीपण आमच्या सारखाच विचार करतात की. रविवारी मस्त संध्याकाली आम्ही मित्र पावसात भिजत असताना हाच मुद्दा नेमका चर्चेस होता. बाईक, मोकळे केस, भजी चहा..वाह..

Vidya Bhutkar said...

Wow what a romantic thought. :-) I miss all that now. :-( Esp khadakvasla along with :=) bike,chaha,bhaji ani paus.
-Vidya

Monsieur K said...

very romantic indeed! hope you find that s'one special soon, maybe in this year's monsoon itself :)

Sneha Kulkarni said...

I too wish like Ketan. You will find someone very soon in this monsoon..(Monsoon wedding? ;)take it lightly) BTW thanks for commenting on my post.

कोहम said...

स्नेहल. छान लिहिलं आहेस. अतिशय आवडतं मला, कोणी असे मनातले विचार जसे च्या तसे उतरवून काढले की. लाजवाब....

Oxymorons said...

Very nice and romantic..
The beauty of it is your transparancy. It feels like touching you through a mirror. This is indeed a skill..
Keep writing, and hope u'd find someone special very soon

Unknown said...

khupach chaan...agadi manapasun!!
"रिमझिम पावसाचे थेंब मला भिजवताहेत....पण त्याहून जास्त मी त्याच्या मनकवड्या प्रेमाने भिजतेय..." wowww...so romantic!
wish you will get someone special very very soon...n that too in this monsoon :)

स्नेहल said...

सगळ्यांना धन्यवाद!!!

देव तुमची इच्छा (मला 'तो' भेटण्याची) लवकरात लवकर पूर्ण करो अशी मी प्रार्थना करते :)

Anonymous said...

Best Blog that I have ever read....
Keep the blogs coming in..

Dr. Prasad S. Burange said...

I am NOT a great Marathi literature reader. I like to be in the science and reality than imaginary thoughts. I think it's one of the most impressive blogs I ever read. I didn't feel it boring at any point. Everytime I was compelled me to think: What next? It's really a nice composition by Snehal. I personally told her that she might have elaborated the last climax section more where, I think, she preferred to wrap it faster. On the scale of 1-5 stars, I will give 5/5. Keep it up Snehal! We would like to enjoy more blogs originated from your imagination.

समीर..थंड हवेची झुळुक said...

dear mast lihil aahes...ashicha pavasali swapn prateyk man pahat asata...