४ सप्टें २००६... खर्या अर्थाने करीयर सुरू करून ६ वर्ष झाली... म्हणजे अर्ध तप.. किती बदल झाले ६ वर्षात? माझ्यात आणि IT क्षेत्रातही...
कँपस मधून जिथे select झाले होते ती कंपनी R&D center असल्याने Pune office बंद करणार होती... मग दुसरी कडे शोधाशोध चालू झाली. freshers साठी out of campus interview हे जरा कठीण काम असतं. जरा एक दिड महिना हातपाय हलवल्यावर एका छोट्या कंपनी मध्ये join झाले... तारीख होती ४ सप्टें २००० त्यावेळी जावा बर्यापैकी नवीन होतं आणि microsoft ने IT क्षेत्र काबीज केलेलं होतं. प्रवाहापरमाणे मी पण VC++, COM, DCOM मध्ये काम करू लागले. जाम धमाल यायची. मझ्या lead चे MFC claases तोंडपाठ होते मी आपली MSDN वर च विसंबून होते. MSDN चा किती अधार वाटयचा तेंव्हा. आतासारखे टाक google ला query असा प्रकार तेंव्हा करत नसे मी. आणि google पेक्षाही altavista जास्त वापरत असत लोक. एक तर internet चे पण फ़ारसे प्रस्थ नव्हते.. साहजिकच firewall हा प्रकार हि मोठ्या कंपन्यांपुरता मर्यादित होता.. सुदैवाने अमच्याकाडे firewall नव्हती... सगळ्या web sites open होत्या... काय काय surf करयचो आम्ही... office मध्ये जवळ पास सगळेच जण २२ ते २८-३० च्या मधले... दंगा करायचू खूप. पैसे कमी मिळायचे पण काम करायला मजा यायची. काहिही झालं तरी कंपनी ला शिव्या घालायच्या हा एक कलमी कार्यक्रम असे. त्याशिवाय एकहि दिवस जात नसे . :)
२००० मध्ये करीयर सुरू झाल्याने 9/11 ची मी झळ सोसलेली आहे. IT job market was never that bad before... कल्पनेपेक्षाही भयानक परिणाम सोसले तेंव्हा IT ने. २००१ आणि २००२ हे पूर्णपणे ले ऑफ चे दिवस होते असं म्हणलं तर अतिशयोक्ती होऊ नये. मोठ्या कंपन्या तर सोडाच.. पण माझी कंपनी जिथे आम्ही जेमतेम ४० लोक होतो... तिथे हि ३ बॅच मध्ये ले ऑफ केला गेला. ज्याच्या बरोबर आपण काम केलं त्याला कंपनीने असं हाकलून देताना बघताना खूप त्रास व्हयचा. पण बघत बसण्याशिवाय पर्याय नव्हता. नवीन नोकरी मिळवणे हि तितकेच अवघड होते. आहे ती नोकरी सांभाळने हेच एक आव्हान होऊन बसले होते. US, UK मधून हि लोक परत येत होते. IT चा फुगा जोरात फुटला होता. campus recruitment, increments, onsite opportunities सगळचं मंदावलं होतं. जावा वाल्या लोकांनी खूप वाईट दिवस बघितले या काळात. microsoft वाले फार सुखात होते असं नाही पण त्यातल्या त्यात बरं चालू होतं. गेले ते दिन गेले!!!
२००२ च्या शेवटी job market सुधारायला सुरूवात झाली. काही MNCs नव्याने देशात येऊ लागल्या... २००३ मध्ये IT क्षेत्राने जणू कात च टाकली. दिवस पाळटले. पूर्वीइतकं नाही पण job opportunities वाढल्या. काहि कंपन्या aggresive recruitment करू लागल्या. याच काळात मग मी पण job बदलला... मी जेंव्हा आताच्या freshers ना बोलताना बघते.. तेंव्हा मला इतका बदल जाणवतो... अम्ही करीयर च्या सुरूवातीला कधीच salary, onsite या बाबतीत इतके आग्रही नव्हतो. हसत खेळत काम करणे आणि क.म्पनीला जमेल तेंव्हा आनि तितकं नावे ठेवण.म यातच काय ते आमचं सुख!!! पण त्या नावे ठ्वण्यातहि एक मजा होती. कमी पैशात सुख होतं. आता पैसे जास्त मिळतात पण तशी मजा येत नाही. कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है!!
गेल्या सहा वर्षात IT ने चांगले आणि वाईट दिवस बघितले... यापुढे या क्षेत्राला चांगलेच दिवस बघयला मिळोत... आणि अमचे भले होवो. :)
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
बराच analysis केलास. डोळ्यासमोर चित्र उभं राहीलं.
हं!!! आय टी क्षेत्रामधिल सर्वात वाईट कालखंडाचा तु अनुभव घेतलेला आहेस. त्यामानाने आता स्थिती खुपच चांगली आहे.
गूगलचा शोध कुणी लावला हे जरा मी गूगल मध्येच सर्च करून बघतो. महान माणूस आहे.
मागे एक जण सांगत होता. कंपनीतलाच. Laay-OFF च्या काळात TM ने भेटायला बोलावलं की माणसे चळाचळा कापत असत. ३ महीन्यांचा पगार आणि सुट्टी.
देव करो आणि अमेरिकेची भरभराट होवो..
बडे चांगले जमलेय... हे मायबोलीवर टाकले नव्हतेस का?
milyaa, naahi re.. navhat Taakal maayboliwar.. kuthe Taaku hech kaLala nahi actually :)
Post a Comment