Monday, December 03, 2007

नको तो गाण्याचा कार्यक्रम!

गाणं हा माझा जिव्हाळ्याचा विषय! मग ते कुठलंही गाणं असो....नवीन, जुनी अशा बंदिस्त आवडी नाहीत.... जे कानाला आवडेल, ज्याचे शब्द स्पष्ट ऐकू येतात असं कुठलही गाणं मला आवडतं. स्वत: गाणं शिकलेले असल्याने काहि काही गोष्टी (बहुतेक) जास्त कळतात (असं मला वाटतं) आणि मग ऐकताना साधं वाटणारं गाणं, विशेष काहि समजल्याने जास्त आनंद देऊन जाते.
पण हल्ली या गाण्याच्या stage shows ने अगदी उत आणला आहे. "अमुक-तमुक" कि "सुनहरी यादें", "अमुक-तमुक" ना "श्रद्धांजली"... वगैरे साच्यातले कार्यक्रम अगदी नकोसे झाले आहेत. जुनी गाणी आणि गायक-वाद्यवृंद नवीन! मग त्या जुन्या गाण्याच्या गीतकार, संगीतकाराची वारेमाप स्तुती करणारे निवेदन! "क्या बात है" टाईप च्या त्याच त्या प्रतिक्रिया...अगदी शक्यच असेल तर "त्यां"च्या बरोबर त्या काळी काम केलेल्या लोकांच्या काही आठवणी, "ते" महान कसे होते वगैरे वगैरे!!! जुनी गाणी अलौकिक सुंदर आहेत, जुने गीतकार, संगीतकाराची अत्यंत प्रतिभाशाली होते...एकदम मान्य!! याविषयी माझं दुमत नाहीच आहे. पण किती वेळा तेच ते ऐकायचं? नवीन गायक आहात ना? मग नवीन गाणी म्हणा ना... लाखो लोकांनी हजारो वेळा ऐकलेलं लठ्ठ तिकिट देउन परत यांच्या तोंडून काय ऐकावं? बरं आजकाल music systems इतक्या सुंदर आहेत कि original track मिळवा आणि गाण्याचा आनंद घ्या!! गाण्यातला छोट्यातला छोटा आवाज स्पष्ट ऐकू येतो! नवीन लोकांनी नवीन काही करून प्रसिद्धी मिळवावी यासारखा आनंद नाही. Live performance ची मजा काही और च असते. पण शक्यतो तेव्हा जेव्हा मूळ गायक तो स्वतः देत असतो.
बरं, जुनेच गायचे तर मग ठरविक चार लोकांभोवतीच का फ़िरतात हे लोक? मराठीत बाबूजी, गदिमा, खळे, हृदयनाथ (क्वचितच) तर हिंदित आर.डी, कि.कु. वगैरे! बाबूजी तर जिवंत असताना जितके प्रसिद्ध होते तितकेच किंबहुना जास्तच प्रसिद्धी त्यांना नि त्यांच्या गाण्यांना मरणोत्तर मिळाली. परत एकदा, त्यांच्या प्रतिभेबद्दल मला अजिबात शंका घ्यायची नाही, पण तेच ते ऐकून कंटाळा येतो!! "सा रे ग म प" च्या पहिल्या पर्वात "खळें"च्या गाण्याचा एक भाग झाला. त्या संपूर्ण भागात स्पर्धक हा जणू गौण भाग होते. संपूर्ण कार्यक्रम "खळे गौरव" होता! देवकी पंडीत ला तर "खळे" म्हणलं कि किल्लीच बसते. कमीतकमी ५-६ वाक्य बोलल्याशिवाय बाई काही थांबत नाही.
बरं, जुनी गाणी म्हणताय ना....मग लता ची तार सप्तकातली गाणी म्हणा, मन्ना डे ची जमताहेत का बघा. तर नाही... एक जण कोणी "तेरे मेरे बीच में", "लग जा गले", "लागा चुनरी में दाग" म्हणायचं धाडस करत नाही. नवीन लोकांना जमणार नाही असं मला challenge नाही करायचं आहे, पण ते का करत नाहीत हे जाणून घ्यायचं आहे!
जुन्या चांगल्या गोष्टी जपल्याच पाहिजेत, त्या नवीन पिढीपर्यंत पोचल्या पाहिजेत, हे खरं आहे. पण त्याच बरोबर, नवीन निर्मिती देखील व्हायला हवी. कुठल्याही सुसंस्क्रुत, अभिरूचीपूर्ण समाजाचे ते लक्षण आहे. जुन्या गोष्टी वारसा आहे, तो जपायचा, पुढे न्यायचा. पण तोच उगाळत बसायचा का?
मला तर या "जुन्या" गाण्यांच्या कार्यक्रमाचा मनस्वी कंटाळा आला आहे. "अति झालं नि हसू आलं" असं झालंय बहुतेक. गाणी ऐकायला प्रचंड आवडणारी मी म्हणूनच हल्ली अशा कार्यक्रमाला जायचं टाळते. वाटतं नकोच तो गाण्याचा कार्यक्रम!

13 comments:

Vaidehi Bhave said...

"देवकी पंडीत ला तर "खळे" म्हणलं कि किल्लीच बसते. कमीतकमी ५-६ वाक्य बोलल्याशिवाय बाई काही थांबत नाही."

lol...अगदी मनातलं बोललीस.

एक किस्सा आठवला. कुमार गंधर्वांसमोर कोणीतरी सारखं जुन्याचे कौतुक करत होता, कुमारजी त्याला म्हणाले "जुनं आवडतं तर बैलावर का बसत नाही, बैलगाडीतच बसता ना?"
अर्थात हा किस्सा मी सारेगम मध्येच ऐकला हा भाग वेगळा ..

यशोधरा said...

छान लिहिल आहेस, पटल अगदी!!

Tatyaa.. said...

छान आहे लिहिलं आहे. छान आहे तुमचा ब्लॊग!

आज अचानक माझ्या चाळण्यात आला!

शुभेच्छा!

-- तात्या अभ्यंकर.
http://www.misalpav.com/

Monsieur K said...

know wot? if u watch such a program once in a while - after a long time - u like it.
but if u watch them e'day, or try to follow them - i am not so sure if u would like them.

sadhya tar asha programs cha bhadimaar aahe - each competing channel has its own talent hunt. had read an interesting article in TOI or some place, in which the author compared the success of these talent hunts with the K-series a couple of years ago - and found the common thread in them - emotional blackmail - yep!!
in both kinds of programs, the channel tries to appeal the sensitive side of the viewer.

nevertheless, i guess i have taken the discussion to a different tangent.

aint sure if the participants or singers would be able to sing new songs, or tough songs - and even if they did - how many of us would be able to appreciate that?

am sure even this fever of music competition based reality show would die down some day.. just like the K-series or KBC fever has died down.. maybe some channel would take a leaf out of your book and promote singers who can sing their own compositions.. lets hope that happens :)

प्रशांत said...

100% paTala.

संदीप चित्रे said...

स्नेहल,
लेख छान झालाय. नवीन चांगलं काही पहायचं / ऐकायचं असेल तर "आयुष्यावर बोलू काही" नक्की पहा, अर्थात अजून पाहिलं नसशील तर :) योगायोगाने मी कालच "आयुष्यावर..."चा review माझ्या blog वर पोस्टला आहे. www.atakmatak.blogspot.com

सर्किट said...

haa..ha..:-) agadi satvik santapane lihilayes.. ekdum paTyaa.. Ketan mhanato tasa hya type che program TV var ani tehi 2/3 mahinyatun ekada pahile tarach bare vaTatat.

शैलेश देवस्थळी said...

खुप छान लिहितेस्. आसेच लिहित रहा...

शैलेश देवस्थळी

HAREKRISHNAJI said...

मान्य

सर्किट said...

एका नव्या ’स्पिन द यार्न’ मध्ये सहभाग घेण्यासाठी तुम्हाला आमंत्रित केले जात आहे. लेखनात भाग घेण्यासाठी, फ़क्त वाचायला नाही काही. :)
http://sty-mar1.blogspot.com/

a Sane man said...

kharay

june sonach aahe...paN mhanun kay navin dagine banvaychech nahit ka?...

fad aahe nasta..paN arthaat kahi kahi karyakram adhun madhun barehi vatatat hehi khara...pan ati sarvatra varjayet hech khara...

परागकण said...

agadi agadi :)

Anonymous said...

humm !! kahi vidhane tar ekadam dhadasi keli aahes.. pan ekandarit patatay thode phar!! kahi ajibat nahi..

abhi