Wednesday, September 12, 2007

जगी सर्व सुखी असा कोण आहे?

सकाळी ऑफिसला जायला निघाले आणि वाटेत असतानाच माझ्या आधीच्या कंपनीतल्या एकाचा फोन आला..
"स्नेहल, सॉरी काल बॅटरी संपली म्हणून परत फोन नाही केला....."
"हो का? बरं, काय म्हणतोय प्रोजेक्ट? offshore ला पण घेऊन आलास का ते काम?"
"अगं, घेऊन तर आलोय, पण म्हणावं तसं कामच नाही. आता मॅनेजर म्हणतोय कि बेंगळूरला जा"
"वा!! मग??"
"मग काय?? बायको सोडेल मला.... लग्न झाल्यापसून स्थिरत्व नाही. आधी बेंगळूर मग ऑस्ट्रेलिया..आता जरा पुण्यात घेतलेल्या घरात राहिन म्हणतो तर परत बेंगळूर!!!"
"पण मग पडा कि बाहेर....काय पण ते फ़ेविकॉल वाल्या खुर्ची वर बसल्यासारखं चिकटून बसला आहेस"
"हो ना... तेच तर! तुझ्या कंपनी मध्ये असेल काहि तर सांग ना!!"
"अरे, सध्या तरी नाहिये काहि. पण सध्या ’त्या’ कंपनी मध्ये आहे. मला ऑफर आहे, पण पैसे, काम कशात काहि फरक नाही म्हणून नाहि जात आहे मी. तू बघ."
"हो, बघतो ना. इथे बसून काहि भलं होईल असं वाटत नाहीये. तुझं बरं झालं, वेळेत बाहेर पडलीस"
"बस का.... तुला ना लेका, हवं होतं तेव्हा onsite पाठवलं ते विसरलास का?"
"पण काय उपयोग? बायको नाही रमली ना तिकडे. मग काय??"
"हम्म्म, बरं मी सांगते कुठे काहि आहे असं कळलं तर "
"please यार. चल मग नंतर बोलूयात ३-४ दिवसांनी. आता जरा मॅनेजरला बेंगळूरला जात नाही अशी मेल मारतो."
"ओके. बाय"

-------------------------------------------------------------
ऑफिस मध्ये आले. पाचच मिनिटात एक मैत्रिण बोलायला आली. काहि कारणाने ती गेले २ आठवडे ऑफिसला आली नव्हती.
"हाय स्नेहल"
"हाय!! मी पाहिलं तुला...मॅनेजरच्या केबिन मध्ये"
"अग हो ना. कसा आहे ग तो" प्रचंड वैतागून ती सांगत होती.
"का? काय झालं?"
"मी म्हणाले रिलीज हवाय प्रोजेक्ट मधून.... तर सरळ नाही म्हणतो. मला म्हणे तुला हवी ती flexibility देतो.... उशीरा ये, लवकर जा...अगदीच जमत नसेल तर एखाद दिवस सुट्टी घे. पण रिलीज नाही."
"हम्म्म्म्म"
"असं कसं म्हणू शकतो हा? माझी कंडिशन त्याला सांगूनहि असा का वागतो हा? म्हणजे मी इतके दिवस चांगलं काम केलं हे चुकलंच का?"
"chill madam!!! किती चिडचिड करते आहेस? आपण जरा दुसरं काहि सुचतंय का बघू ना!! तू घरी पण बोल"
"अगं पण....मला नाहिच जमणार आहे इतक्या लांब यायला आता. आणि आहे ना गावात ऑफिस..मग?"
"हो हो....चल आता जेवायला जाऊ. तू जरा icecream वगैरे खा :) थंड होशील :))"

-------------------------------------------------------------

"हॅलो स्नेहल, xxxx बोलतोय."
"येस xxxx"
"ते आपलं मेट्रिक्स शीट आहे ना... त्यात जरा चेंजेस करायचे आहेत"
"म्हणजे परत manipulation??"
"नाही नाही....आधीचं manipulation काढून टाकायचं. realistic data ठेवायचा. so delete that manipualed row, and send it across"
"ok. But was there any utilization issue raised"
"we will discuss it later. For now, change it and send, ok?"
"yes"

मी काहिशी चिडून excel sheet modify करायला घेते. मागच्या आठवड्यात जेव्हा मी xxxx ला म्हणाले होते कि इतकं manipulation नको... तर मला म्हणे "we should show it at least near to 95% though not 100%"
आणि म्हणून मी तेव्हा modify केलं... आज आता ते काढा... इकडे ग्राहकाने पण काम देऊन ठेवलंय, ते पण करा :(( भगवान उठा ले रे बाबा. मेरे को नहिं.....

-------------------------------------------------------------

"ए स्नेहल, बिझी आहेस का?"
"का रे?"
"५ मिनिटं काम होतं जरा"
"बोल ना.."
"ते खराडी कुठे आलं?"
"इथून ५-६ कि.मी असेल. याच रोड ने सरळ पुढे जायचं आणि सोलापूर हायवे साठीच्या वळणाला उजवी कडे वळायचं. पण तुला का जायचंय तिकडे?"
"एका कंपनीत उद्या HR round आहे"
"पाटिल, किती offer घेणार आणि कितींना लटकवणार आहात? पुरे कि आता... तुझं ठरलं आहे म्हणालास ना? मग???"
"हो गं, पण जाऊन बघावं म्हणतो.... देत असतील जास्त पैसे तर बघू"
"काय हे!!!"

-------------------------------------------------------------

काल एकाच दिवसात घडलेल्या या घटना.... सगळयांनाच काहि ना काहि अजून हवंय.... अजून चांगलं!!! आहे त्यात कोणीच समाधानी नाही, सुखी नाही. प्रत्येकालाच वाटतंय कि मला जे मिळतंय ते कमी आहे वगैरे.... म्हणून मग चालू आहे रेस.... धावपळ!!!

हे प्रसंग खरं तर प्रातिनिधीक आहेत.... आपल्या प्रत्येकाच्या भोवती, भोवती कशाला...प्रत्येकाच्या बाबतीत थोड्याफार फरकाने असंच काहि घडत असतं. आपण सुख वस्तूत शोधायला जातो....जे चांगलं आहे ते मला मिळायलाच हवं असं काहिसं सगळ्यांनाच वाटतंय. त्या नादापायी सुख निसटून जातंय... व.पु. म्हणतात ना "सुख हे फुलपाखराप्रमाणे असतं. मागे धावलात तर उडून जातं, शांत बसलात तर अलगद हातावर येऊन बसतं"
आम्हाला हे कळतं...पण मग आजूबाजूचे धावताना बघितले कि आम्हाला पण पळावंस वाटतं.... आणि मग आम्ही पळतंच राहतो. खरंच..जगी सर्व सुखी असा कोण आहे???

10 comments:

Monsieur K said...

:)
even if u win the rat race, u end up being a rat
:)

abhijit said...

खास लिहिलयस एकदम. म्हणून तर मी पहिल्या कंपनीतच इतके दिवस स्वस्थ बसून आहे. इकडे अंगावर बसलेली फुलपाखरे उडाली की आपणही भुर्र व्हायचं

अभिजित पेंढारकर said...

मुद्द चांगला आहे. योग्यही आहे. पण तो तुला आलेल्या अनुभवातूनच लिहिला आहेस. ही गोष्ट झाली, ज्यांच्याजवळ चॉइस आहे, त्यांची. पण ज्यांना तेवढीही संधी नाही, त्यांचं काय?

अनेकांना नावडत्या क्षेत्रात नोकरी करावी लागते. मनाविरुद्ध काम करावं लागतं. त्यांची ज्या कामात रुची आहे, ते त्यात कर्तुत्व सिद्ध करायला कधीच संधी मिळत नाही. नोकरी बदलावीशी वाटूनही बदलता येत नाही. ऑफर नसते, किंवा क्षमता नसते, असंही नाही. पण अनेक व्यवधानं, कारणं असतात. मग वर्षानुवर्षं, कदाचित आयुश्यभर त्याच चक्रात पिचत बसावं लागतं.

आहे ते सुख कमी पडतं, म्हणून चिंता करत बसणार्‍यांपेक्षा या लोकांची व्यथा आणखी गंभीर नाही का? त्यांनी कुणाकडे दाद मागायची?

ओहित म्हणे said...

एकदम realistic ... :) with no manipulations ...!

पण मजा येते ही धावपळ शांतपणे बघताना! ;-) मधेच कंटाळा आला की स्वतः धावायचे ... मन भरले की बसायचे. प्रशांत दामले ला आठवत म्हणयचे ... 'मला सांगा ... सुख म्हणजे ... नक्की काय असतं' :)

Yogesh said...

hi hi.. tumachyakade kay asel tar saang :p

Parag said...

Good one.. :)
Lokanna kaay havay eactly te kalat nahi.. 500 % khara ahe..

TheKing said...

So true!

But funny part is that all those who are running behind these changes/better life/better offers, do they really know what they are looking for?

Very (very) few know that.

Anamika Joshi said...

chhan lihilayes. :) maja ali vachun. agadi uth-suuT dhavadhav karane jase chook, tasech ekach khurchit chipkul tech te eksuri ayushya jagat rahane hi chukach. navya disha, navi gaave, nave lok, navya parisarat janyachi dhadapad karun tithe set hovun dakhavane he challenge hi kadhi kadhi khup kahi shikavun jaate / anand dete. arthat te dar 2 varshanni karanyapeksha 5/6 varshanni kelele uttam. :)

प्रभाकर कुळकर्णी said...

अगं स्नेहल , खरच तु किती बड्बड करतीस गं ? विश्वास बसत नाही. हैद्राबाद ची स्नेहल कुळकर्णी तर नाहीस ना?पण लिहीतेस खुप छान बाकी . वाचताना आनन्द मिळतो . तुला देवाची देन आहे . असच लिहीत जा .

प्रभाकर कुळकर्णी

Abhijit Zope said...

एक नम्बर ब्लॉग...तसा माला बायको अणि जॉब मधे एक साम्य वाटत जशी शेजरच्याची बायको नेहमी सुंदर दिसते तसेच.... हा हा हा !!!! असो