Thursday, August 16, 2007

स्वातंत्र्यदिन

काल १५ ऑगस्ट २००७.... मी काहि वेगळं सांगायला नकोच १५ ऑगस्ट बद्दल. आपण सगळ्यांनीच सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत देश, स्वातंत्र्य, सैनिक, हुतात्मे, प्रगती, क्रांती, वाटचाल वगैरे बद्दल पुष्कळ ऐकलं असणार. :) कदाचित ऐकून सोडून दिलं असणार.
काल आणि आज हि मी अनेकदा हे एक ऐकलं.... भारताचा ६० वा स्वातंत्र्यदिन!!! मला कळत नाही ६० वा कसा? ६१ वा ना? मी शाळेत शिकले तेव्हा तरी आपण १९४७ साली स्वातंत्र्य मिळवलं (हो, मिळालं या क्रियापदाचा मला राग आहे. मिळत काहिच नाही...मिळवावं लागतं) मग १५ ऑगस्ट १९४७ हा झाला पहिला स्वातंत्र्यदिन!!! मग २००७ साली ६१ व ना?
स्वातंत्र्य मिळ्वून ६० वर्षे झाली...एकदम मान्य. पण स्वातंत्र्यदिन म्हणाल तर तो ६१ वा हो!!! पटतंय का?
काल बड्याबड्या लोकांनी भाषणं केली....आज रस्त्यात मोठे मोठे बॅनर बघितले....सगळे आपले ६० वा स्वातंत्र्यदिन म्हणत बसले आहेत. स्वातंत्र्यदिनाला इतर काहि नाही तर निदान जे बोलतो आहोत ते कितपत बरोबर आहे ते तरी बघा लोक हो!!!

3 comments:

Vaidehi Bhave said...

Hi snehal,

ha shabdancha khel ahe. ata dusari bajoo bagh. mhanje udaharan apalya vadhadivasache
janm --1 varsh --> pahila vadhdivas --2 re varsh ---> dusara vadhdivas...

swatantradinababat mhanshil..tar 15 aug 47 la apalyla swatantrya milale...ani 48 la apala pahila swatantrya din...

mi dusari bajoo lihali ahe..pan tu mhanates te mala agadich amanya ahe ase nahi...

चकली
http://chakali.blogspot.com

Yogesh said...

यापूर्वी आपण मराठीत भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापनदिन साजरा झाला असे म्हणत होतो.

आता हिंदाळलेल्या मराठीत भारतीय स्वतंत्रतादिन संपन्न झाला असे म्हणायचे असते.

(यापूर्वी लताबाईंच्या गाण्याने, जीएंच्या पुस्तकांनी जीवन संपन्न-समृद्ध होत असे. आता गल्लीबोळातला गटाराच्या काठाला चाललेला कोणताही कार्यक्रम "संपन्न" होतो.)

संपन्न या शब्दाचा अर्थ मराठीत काय आहे हे जाणूनही न घेता हिंदीवाले वापरतात म्हणून आपणही वापरतो.

अशी किती उदाहरणे देऊ?

जाऊ दे...जास्त त्रागा केल्याने आपल्यालाच त्रास होतो.

Monsieur K said...

Snehal,

you seem to be perturbed by the choice of a certain set of words, while Yogesh has another set. while it is true that we should always use correct words, especially in the context of important things like I-day, how does the common man get affected?
as Vaidehi puts it, you can also defend the other side of it.

to me, I-day brings special memories of the flag hoisting in our school, watching the PM's address from the Red Fort, the I-day celebrations in Delhi that were shown on TV - i havent seen or experienced that in years.

wearing tri-colored pins on your shirts, or holding tricolored paper/plastic flags in your hands - that is how we celebrate I-day now.

and in the end, are happy that we have got one more holiday at work.
60 or 61 is then just a number to us.

sorry, i sound very lousy about the whole thing - but is it far from reality?