Friday, August 10, 2007

खरेदिचं वेडं वेड

रात्रीचे ८.३० वाजले होते.... ग्राहक काकांशी गप्पा मारून खाट्खाट मशिन बंद केलं नि बससाठी पळत सुटले. बस आली.... पटकन मिळेल ती जागा बघून बसले. बस मध्ये नेहमीप्रमाणे रेडिऒ मिर्ची ठणाणत होतं. मला एकतर मिर्ची वाल्यांची ती धेडगुजरी मराठी (कि हिंदि) भाषा ऐकायला जाम आवडत नाही त्यात रात्री काम करून दमल्यावर तर नाहीच नाही. पण इवल्याशा बस मध्ये ४ स्पीकर असताना मला दुसरा चॉईस नसतो.

"अरे सुनो, आज सबके लिये समोसे और मिठाई लेके आना"
"क्यों साब, कोई लॉटरी लगी क्या?"
"अरे जब एक और बिग बजार खुला है तो समझो लॉटरी हि लगी है"

रेडियो वर एक जाहिरात चालू आहे.....
हे सध्या आपल्याकडे नवीनच....मॉल संस्कृती!!! काहि हजार स्के. फ़ूट जागेत टोलेजंग इमारत..... शहरीजीवनात लागणारं आवश्यक अनावश्यक सगळं यांच्याकडे उपलब्ध. आणि कमी किंमतीत असा यांचा दावा! मग हे लोक वेगवेगळ्या आकर्षक योजना सुरू करतात...अगदि काहिहि..... यांचे सभासद कार्ड घ्या. मग प्रत्येक खरेदिवर काहि गुण मिळवा...आणि मग कधीतरी त्यावर काहितरी मिळवा. किंवा रु. ५०० च्या खरेदिवर रु. २५ ची फळे मोफत!! आणि हे सगळं लोकांपर्यंत पोचावं म्हणून सतत माध्यमांद्वारे जाहिरातींचा मारा! वर्षातून अनेक वेळा हे लोक सेल लावतात.....कधी काहि % सूट तर कधी २ वर १ मोफत तर कधी अजून काहि. माझ्या लहानपणी सेल वर्षातून एकदाच लागायचे आणि म्हणून दुकानांबाहेर तेव्हा रांग लागायची...पण आता दर महिन्याला कुठे ना कुठे सेल असतोच तरीहि गर्दी आटत नाहिये. कमाल आहे.
मुळातच आम्ही जास्त चंगळवादी झालो आहोत. गरजेपेक्षा पैसा जास्त, जबाबदाऱ्या कमी...आम्हाला मिळालं नाही ते तुम्हाला मिळतंय तर उपभोग घ्या अशा उदार विचारांची आई बाबांची पिढी. एकूणच काय "कोई रोकने टोकने वाला नहिं" अशी परिस्थिती!! पूर्वी आम्ही फक्त गुढीपाडवा, गौरी-गणपती, दसरा-दिवाळी अशा वेळी खरेदी करायचो....आता यात भर पडली ती अनेक "डे" ची...आज काय friendship day, उद्या boss day, मग कधीतरी fathers day, mothers day, in-laws day. मग परत त्या त्या दिवशी त्या त्या व्यक्ती साठी काहि भेट!!! खरेदिला अजून वाव :)
आक्षेप खरेदिला नाहिये....अवास्तव खरेदिला आहे. काय घेताय त्याची खरंच गरज आहे का?, आपण ते वापरणार आहोत का? आणि त्यापलिकडे जाऊन देतोय ती किंमत योग्य आहे का? याचा विचार करा.... माझ्या निरिक्षणानुसार आजकाल उच्च मध्यमवर्गीय माणूस साधारणपणे २५% वेळा अनावश्यक खरेदी करतो. विचार न करता...मला वाट्लं, आवडलं आणि शक्य होतं म्हणून घेतलं....या प्रकारात ती खरेदि मोडते.
आणि मग याची सवय लागते. झिंग चढते. आज मी रु १५०० चं घड्याळ वापरते, खरं तर रु. ४००० चं आवडलं आहे. मग मी अजून आटापिटा करेन...आणि स्वत:ला रु. ४००० सहज उडवण्याच्या जागी नेऊन ठेवेन. मग त्यासाठी काहिहि.... १२ तास काम करेन...रोज ३० कि.मी इतक्या लांब ऒफिसला जाईन. मग या सगळ्यापायी मी खाजगी आयुष्यातलं काय गमावतेय ते बेहत्तर. सगळं का??? तर मला "lifestyle" हवी. म्हणजे काय तर मी स्वत:च्या गरजा अवाढव्य वाढवून ठेवायच्या.... २ BHK मध्ये राहू शकत असताना ३ BHK घ्यायचा (घरात माणसं ३ च का असेनात!!!)...मग ते महागड्या वस्तूंनी सजवायचं.... खरेदी संपत नाहीये, पैसा पुरत नाहीये...वेळ उरत नाहीये. सगळंच निसटून चाललंय.
एका घरात दोन TV...कशासाठी?? अरे एकत्र बसून गप्पा मारा ना!!! आणि साध्या अर्ध्या तासाच्या कार्यक्रमासाठी का तुम्हाला तडजोड करता येत नाही?? सगळे दागिने असताना परत आवडला म्हणून अजून एक नेकलेस!!! भले आम्ही साड्या वर्षातून १० च दिवस नेसू पण पैठणी मात्र माझ्याकडे २ हव्यात.... ३ वर्षाचा मूल....एका जागी १० मिनिट बसत नसेल पण त्याला किनई आम्ही स्वतंत्र study table घेणार.... खरेदी चक्र फिरत राहतंय...अनावश्यक. साधी राहणी काळाआड चालली आहे.
बाजारपेठेने अशी काहि जादू केली आहे कि बाजात आमच्यासाठी कि आम्ही बाजारासाठी? कळेनासं होतंय.... कदाचित कळतंय पण आजूबाजूचे चार लोक करतात म्हणून मी..... पूर्ण समाजालाच खरेदिचं वेड लागलंय!!!

8 comments:

Vaidehi Bhave said...

खरेदी चक्र lihalays te kharach ahe. mala vatate hi mall sanskruti bharatala kharach parwadnyasarakhi nahi.

udaharnarth, bhaji mandaitoon bhaji, gavachya dudhvalyakadoon dudh, kolinikadoon mase ashaprakare garaja bhagavanyakade purvi jast kal hota. Ata mallsmule sagalyagostit (agadi grocery/kapade ani sagale) ya garib janatecha (unorganized retail) market share kami hot chalala ahe.ani tyane gavanche ani gramin bhagache nuksan hotay..pan apan shahari lok yala sensitive nasato.
pan tuzyasarkhech mazyahi manat vichar yetat..kharach baryach garaja anavashyak ahet.

Vidya Bhutkar said...

्मला तुझे लेख आवडतात, पण हा अगदीच घाईघाईत लिहिल्यासारखा वाटतोय. विशेषत: काही वाक्ये एखाद्या आजी किंवा काकूंनी लिहिल्यासारखी वाटत आहेत. उदा:"पूर्वी आम्ही फक्त गुढीपाडवा, गौरी-गणपती, दसरा-दिवाळी अशा वेळी खरेदी करायचो....आता यात भर पडली ती अनेक "डे" ची.."
तू लिहिलेलं बरंचसं पटतंय मला पण तुझी लिखाणाची पद्धत काही आवडली नाही या लेखात.
-विद्या.

कोहम said...

snehal,
though all new and western is not good, all is not bad too. imagine how many jobs this consumer society is creating. Better to circulate money than pile it up. it loses its value and functionality.
One has to decide one's priorities. For someone it could be shopping. for someone else it could be being with family.
I think more like you. however, we should not force what we think as correct on others. i am blamed of doing that often. cheers.

स्नेहल said...

vidya,

oh asa watatay kaa?? hmmm.... pudhachyaweli lakshat thewen. pan tasahi aga aajkal mala agadi 4-5 warshacha farak asala tari generation gap watate.... thinking process madhye jaam farak janawato :)

koham, mi konala force karat nahiye. fakta jasa wagtay tyacha vichar kara itakach suchawatey.

Vaidehi, thanks! apan insensitive he dekhil anek lokana mahit nahiye ga :(

श्रद्धा कोतवाल said...

स्नेहल, लेख वाचला. मांडलेले मुद्दे बरोबर आहेतही. वर वैदेहीने म्हटलंय तसं छोट्या दुकानदारांमध्ये धंदा बंद पडण्याची भीती आहेच मॉल्सच्या आक्रमणामुळे. पण याला केवळ मॉल्सची जाहिरातबाजीच नाही तर आपली अतिशय घाईगर्दीची जीवनशैलीदेखील कारणीभूत आहे. आपल्या कामांच्या अनियमित वेळांमुळे रात्री उशिरापर्यंत उपलब्ध असणार सोपे पर्याय निवडावे लागतात. उदा, रात्री साडेआठला कंपनीतून निघाल्यावर तुला दूध ब्रेड घ्यावासा वाटला, तर साध्या बेकर्‍या आणि दुधाच्या टपर्‍या बंदच सापडणार. tru mart ला वगैरे पर्याय उरत नाही मग.
ह्या जीवनशैलीत मुळात बदल होणं आवश्यक आहे, हे माझं मत!
विद्या, ती वाक्यं आजी, काकूंनी लिहिल्यासारखी वाटली, तरी ते सत्य आहे गं. अगदी आता आतापर्यंत खरेदी ही काहीतरी निमित्तानेच होत असे. त्यामुळे मर्यादित दुकानं, मर्यादित माल असं असलं तरी ते पुरेसं होतं. भरपूर मालाची निर्मिती आणि तो खपवण्यासाठी लोकांमध्ये भ्रामक गरजा निर्माण करणं हे निश्चितच अयोग्य आहे.
That too when we (atleast in india) are drawing hefty salaries in a service based industry. What if outsourcing starts going to other countries who can do it at cheap rates? हा फुगा फुटायला वेळ नाही लागणार मग. ( सॉरी, थोडा भरकटला विषय, पण या लेखावरून तो आठवला इतकंच!)

Monsieur K said...

Snehal,
you have captured an interesting phenomenon - most of us (25-30 year old bracket) are kids/young adults who have kind of seen both - the pre & post-liberalisation eras.
as kids, i would get new clothes on my b'day and during diwali.
going to a restaurant (once a month or so) would be a big thing.
and grocery shopping would happen from the neighbourhood grocery store - many of the ppl working there, i would be knowing personally.
but times have changed - yes, all of us have bigger pay checks; many of us think that we "suffered" during our childhood; malls have opened new "aspirations" - be it electronics, apparel, furniture, etc.
i was in Vaishali for b'fast this weekend, and had to wait a good 10 mins. as my frnd put it,
"punyaatle loka aata ghari jevat-ch naahit - not even b'fast!"

the problem is - as a society, we have become more materialistic.
as koham says, to each his/her own!

i agree with vidya - u seem very agitated when you wrote this - wudnt necessarily call this as "kaku/aaji-bai" style of writing - but this post isnt in your usual humourous sense.
hope to see a new post in your usual style soon! :-)

TheKing said...

So true. There exist very few people today who have their own personality, who have their own priorities they stick to.

Rest, just follow the crowd.

Yogesh said...

या मॉलची काही अडचण नाही. जोपर्यंत तिथं येणारी गिर्‍हाईकं आपल्या गाड्या रस्त्यावर गुरांप्रमाणे सोडत नाहीत तोपर्यंत.

असो. मराठी ब्लॉगवर इंग्रजीत प्रतिसाद वाचायला मजा वाटते. ;)