Saturday, May 19, 2007

नवीन गडी...नवा राज

या ७ तारखेपासून पंचमोध्याय सुरू झाला...माझ्या एका मित्राच्या भाषेत मी नवीन थाळीत जेवायला लागले. (as per him...anywhere u go, its same food in a different plate!!!) नेहमीप्रमाणे join झाल्यावर इथल्या लोकांनी ते काय काय नि कसं करतात ते अगदी फुगवून फुगवून सांगितलं. खरं तर कुठेहि जा, कंपनीबद्दल पूर्णत: चांगलं ऐकायला मिळणारे दिवस म्हणजे हे induction चे दिवस!!! वेगवेगळे लोक येऊन काय काय बोलत होते... मी मात्र बॅंकेच्या लोकांची वाट बघत होते...हो, एकदा का salary account ओपन झालं कि काम भागलं. पहिल्या दिवशी दिलेला चहा आणि जेवण मात्र चांगलं होत. (खाल्ल्या अन्नाबद्दल मी नेहमीच खरं बोलते.)
अजून पहिला दिवस संपतो न संपतो तोच माझ्या इथल्या नवीन मॅनेजर चा फोन...कि उद्या येऊन भेट. मी मनात म्हणलं जरा श्वास तर घेऊन द्या...नंतर आहेच बैल राबायला!!! ठरल्याप्रमाणे त्याला भेटायला गेले तर हा माणूस माझ्यासाठी जेवायचा थांबला होता. बाप रे!!! हे मला जरा नवीन होतं. मग जरा अनौपचारिक गप्पा मारत आमचं जेवण झालं (आज मी डबा नेला होता....त्यामुळे quality n taste बद्दल काहि शंका नको!!!) माझ्या आजवरच्या सगळ्या मॅनेजरप्रमाणे हा पण non-smoker.... देवाची कृपा!!!
जेवण झाल्यावर टिम शी ओळख....एकूण लोक ४...सगळे तेलुगू :( म्हणजे मला कायम आंग्ल भाषेत च बोलावं लागणार (कोकाटे क्लास लावावा कि काय?) बरंय निदान मॅनेजर तरी मराठी आहे. मोजून मापून कोकणस्थ आहे!!!
पुढे दोनच दिवसात मला मशिन मिळालं, मॅनेजर काकाने स्वत:हून net connection दिलं...वा वा वा!!! कामाला (कि टिपीला???) सुरूवात झाली. प्रोजेक्ट तसा बरा आहे...अजून काम खेचणं आता माझ्याकडे लागलंय. बघू....काय घाई आहे?
तर मी बसते ती जागा pantry च्या अगदी जवळ आणि मॅनेजरच्या बरीच लांब आहे...त्यामुळे पामर सुखी हे सांगणे नकोच!!! आजूबाजूला पूर्ण आंध्रप्रदेश आहे....त्यांच्याबरोबर काम करता करता मी एक दिवस कदाचित तेलुगू ब्लॉग लिहायला लागेन...शक्य आहे, कालच नाही का त्यांच्या नादी लागून मी आंध्र मेसमध्ये जाऊन ३ वेळा भात खाल्ला!!
इथल्या काहि आवडलेल्या गोष्टी, ५०० र. मध्ये बससेवा!!! तेहि चांगल्या लक्झरी बस, रेडिऒ नीट ऐकू येईल अशा. (आधीच्या कंपनीच्या बस्मध्ये रेडिऒ कमी नि खरखर जास्त ऐकू यायची) लायब्ररीमध्ये non technical पुस्तकं, management चे पुस्तकं भरपूर आहेत. परवाच ’wise and other wise' आणलंय. yaahoo messenger इथे officially चालतो :)
ज्याचा तीव्र निषेध करावासा वाटतॊ ते म्हणजे icicidirect , मायबोलीवर बंदि आहे. हा काय अन्याय!!! icicidirect नाही तर मी चार पैशाचे २० पैसे कसे करायचे हो?? आणि मायबोली नाही तर मग आम्ही आमचं मन कुठे जाऊन हलकं करायचं??? श्या...अजून थोड्यादिवसाने आवाज उठवला पाहिजे या विरुद्ध!!! पण सध्या जरा शांत आहे मी....नवीन गडि आहे ना...जरा सरावले कि मी पण माझे अंतरंग दाखवायला सुरू करेन!!! :)

10 comments:

Monsieur K said...

as i finished reading this post, i saw your 'about me' section and i couldnt stop myself from smiling. :)
all the best for your new job.

~Ketan

Tulip said...

Snehal.. shubhechhha tula navya job sathi. tashi ruLaleli distech ahes already:)). Nice post.

Yogesh said...

नीवू एला उन्नावु स्नेहलगारु?

नाहीतरी चार हिंदी टाळकी असल्यावर आपण सगळे आपोआप हिंदी बोलायला लागतोच ना ;) आणि संत ज्ञानेश्वरांनी तेलुगूमधून बरेच शब्द मराठीत आणलेत त्यामुळं तेलुगू शिकायला अडचण येणार नाही...

ICICI Direct नाय म्हंजे जरा कठिनच हाये म्हनायचं. :(

Samved said...

हाय (इंग्रजीतला), खुप दिवसांनी ब्लॉग वाचला. मजा आली. नव्या जॉब साठी शुभेच्छा.

कोहम said...

Snehal,

All the best. mala vatala ki kamaat khup mhanaje khup mhanaje khup busy hotis mhanun blog lihit navhatis.....he telgucha changla aahe...khali marathi translation tak mhanaje zala..

राफा said...

तुला नवीन थाळीबद्दल शुभेच्छा ! ('समोर काय ताट वाढून ठेवलय बघू' अस म्हणाली होतीस का ?)

आणि All the best ! (म्हणजे तुझ्या मॅनेजर काकांना :)).

icici direct नाही म्हणजे तुला अगदी suffocation होत असेल ना. i can understand.

देव (sysadmin@universe.com ! ) करो आणि दोन्ही साईट्स (icici आणि मायबोली ) चालू होवोत :)

चैतन्य देशपांडे said...

Actually, I usually read many posts from your blog, but this post was too much touching because i also began my new job just few days before.
So, it was quite resembling to my personal experience. Great! keep it up..
And Congrats for new job!

TheKing said...

Navin jobsathi best wishes.
Mayboli chalu nasle tari blogger chalu ahe he kahi kami nahi. So that should ensure ur posts at least once in a while for us!

Unknown said...

Khupach chan post aahe. Khup chan lihites. Asach lihi. Ek Vicharu.

एकूण लोक ४...सगळे तेलुगू :( म्हणजे मला कायम आंग्ल भाषेत च बोलावं लागणार ) tu TCS la join zalis ka?

Anonymous said...

too good.. hats off to you!!!!