Friday, February 09, 2007

ऐसा मित्र शिरोमणी

तो आणि मी...आमची मैत्री १२ वर्षांपूर्वीची!!!

अगदी पहिल्याच दिवशी मला कॉलेज मध्ये पोचायला उशीर झाला होता... वर्गात पोचले तर तास आधीच सुरू झाला होता... मी excuse me म्हणून आत शिरले... अगदी त्या क्षणाला मला दिसलेला तो हाच!!! सहा फूट दोन इंच उंची, शांत चेहरा...

नंतर कॉलेज रूटिन चालू झालं.. stats practical ला तो आणि मी एकाच बॅच ला आलो. सकाळी ७ ला practical असायचं, तर हा पठ्ठ्या त्या आधी १० मिनिटे येउन उभा असायचा!!! कॉलेज सुरू होऊन सहा महिने उलटून गेले तरी आम्ही कधीच बोललो हि नव्हतो... तशी ओळख झाली ती पहिल्या ट्रिपला...आणि बघता बघता आज १२ वर्ष हौउन गेली :)

खरं तर आमच्यात खूप कमी साम्य आहे...जवळ जवळ नाहीच म्हणलं तरी चालेल. दिसण्यापासून, खाण्यापासून ते अभ्यास, खेळ सगळंच वेगळं आहे. मला नेहमी प्रश्न पडतो की इतके फ़रक असताना तो माझा इतका जवळचा मित्र कसा झाला?? ज्या गोष्टी मी जितक्या सहजपणे याच्याशी बोलू शकते, शकले...जितक्या शांतपणे हा माणूस ऐकतो तसं इतर कोणीच मला भेटलं नाही. म्हणजे ऐकताना फ़ाटे फ़ोडणे, सल्ले देणे हे असं करणारे बरेच आहेत... पण नुसतं ऐकणारा असा हाच!!! (त्याच्या या निर्विकार ऐकण्याच्या स्वभावाचाच त्याच्या बायकोला आता त्रास होते!!!) मध्यंतरी माझ्या आयुष्यात जरा वादळ उठलं होतं, मी एकटी पड्ले होते... पण तरीहि याने साथ सोडली नव्हती. माझ्या नकारत्मक, सकारात्मक सगळ्या आयुष्याचा हा सा़क्षीदार.... आज मी जेव्हा म्हणते कि मी चुकले होते का रे तेव्हा? तर तो नेहमी म्हणतो... "ज्या वेळेस तू तशी वागलीस तेव्हा तुला ते चूक वाटत होतं का?? नाही ना!!! मग? प्रत्येक वेळेची, वयाची विचारांची काहि गणितं असतात... मोठे झाल्यावर ती गणितं चुकिची वाटत असतीलहि पण म्हणून त्या त्या वेळेला तसं च बरोबर वाटतं"... असा धीर दिला कि इतकि उभारी येते.

आमच्याच ग्रुप मधल्या एक मुलगी त्याला आवडू लागली... होकाराची खात्री पटल्यावर साहेबांनी तिला प्रपोझ केलं...आणि अपेक्षित होकार कळल्यावर पहिलं कोणाला सांगितलं असेल तर मला!!! त्या दिवशी त्याच्यापे़क्षा जास्त आनंद मला झाला होता... आता मला जवळचा मित्र आणि तितकीच जवळची मैत्रिण मिळाली होती. तिघे एकत्र सायकल वर कॉलेज ला जायचो... computer assignments पण त्या दोघांनी एक आणि मी एक असा प्रकार असायचा.. पण print outs ३ असायची :) धमाल यायची.....
याच्या घरी शोकेस मध्ये drinks असतात असं कळलं तेव्हा कोण आश्चर्य वाटलं होतं.... drinks घेणारे सगळेच दारुडे असतात असं नाही इतकं कळायला तेव्हा अक्कल कुठे होती?
कॉलेज संपलं.... PG साठी सगळेच वेगवेगळ्या ठिकाणी गेलो.. तो C-DAC साठी मुंबाईला... आता भेट कमी होत होती.... नवीन कॉलेज मध्ये नवीन लोक भेटले..पण या सम हाच!!!
नंतर मग जॉब!!! दुर्दैवाने त्याच्या कंपनी मध्ये layoff झाला आणि याचा जॉब गेला.... हे ऐकल्यावर मलाच खूप हादरा बसला होता. त्याला कसा धीर द्यायचा, काय बोलायचं विचार करत करत च त्याला भेटायला गेले तर हा एकदम शांत बसला होता!!! जणू काहि आता काय होणार आहे, काय करायचं आहे हे त्याला स्पष्ट माहित होतं. आणि झालंहि तसंच..... सुरूवातीच्या १-२ वर्षात त्याने जे काहि केलं, तो अनुभव आज त्याला इतका पुढे घेऊन गेला आहे कि मन भरून येतं.
दरम्यान त्याचं लग्न झालं, नवीन फ़्लॅट, गाडी..... settle झाला तो!!! अधून मधून तो परदेशी जात होता..कधी मी पण!!! आता भेटणं म्हणजे प्लॅन करावं लागत होतं....
या वर्षी गण्पतीतली गोष्ट... त्या दोघांचा फोन आला... "आम्ही दोघे germany ला जायचा विचार करतोय..." त्याला कंपनीने चांगली संधी दिली होती. ते पुण्याहून निघायच्या आधी आम्ही भेटलो....
फ़क्त आपण तिघे भेटू, ग्रुप मधलं इतर कोणी नको ही माझी अट!!! कारण जे आम्ही तिघे share करू शकतॊ ते इतर कुणाला कळण्याच्या पलिकडे आहे.... ज्या मित्रा बरोबर मी सायकल ने जायचे...आज त्याच्या कार मध्ये बसताना काय वाटलं असेल मला.... खूप छान....शब्दांच्या पलिकडले!!!
आता ते दोघे germany मध्ये आहेत...चॅट, orkut वर बोलणं चालूच असतं....कितीहि दूर असलो तरी मैत्री अजून तशीच आहे....तशीच राहिल!!!
आज हे सगळं आठवायचं कारण... काल बरेच दिवसांनी त्याला ईमेल केली... आज त्याचा रिप्लाय आला. "तुझी ईमेल सिग्नेचर छान आहे."...
मी ही सिग्नेचर लिहून जवळ जवळ महिना झाला.... कोणी हे नोटिस नाही केलं..आणि एका मेल मध्ये हे कदाचित फक्त तोच बघू शकतो!!!

10 comments:

Mints said...

ेअसे मित्र मिळणे ही आयुष्यातली सर्वात महत्वाची asset !!!
Keep writing!

yogesh said...

असे मित्र मिळणे व मैत्री टिकून राहणे हा खरं तर नशीबाचाच भाग आहे.

प्रिया said...

खरंय मैत्री होणं या पेक्षा ती टिकून राहणं फार अवघड... दिवस बदलतात, priorities बदलतात, माणसं बदलतात... या सगळ्यातून टिकून राहते तीच मैत्री! :) May you be always blessed with great friends!

Monsieur K said...

खूप छान लिहिलं आहेस, अगदी मनापासुन!
मैत्री पण अशीच असते, मनापासुन असली की अशीच छान खुलते...
btw, तुझ्या email signature मधे तु काय लिहिलं होतस? :)

~ketan

abhijit said...

ज्या वेळेस तू तशी वागलीस तेव्हा तुला ते चूक वाटत होतं का??

ha prashn khup mahatvacha aahe..aani tumhala depression avoid karayla madat karto.

asha mitrannach samarpit ek kavita mi nukatich blog madhye post keliye.

सहज said...

nashibvan aahes !!

P.S. - mazya blog che 'Akshar lgatay' ka aata ? ..please confirm if not let me know how u do it for urs.

सहज said...

I write in both marathi and hindi. I hope you can see the marthi font as well on my blog.

- Sahaj :)

स्वाती आंबोळे said...

छान लिहीलंयस स्नेहल. तुमच्या मैत्रीला हार्दिक शुभेच्छा! :)

अभिजित पेंढारकर said...

hey, snehal,

very nice and sentimental post.
i have yet to read most of your posts.
will do it sooon, as per time permits.

but you seem to be a very sentimental, down-to-earth person.

keep it up!!!
keep writing.

bye.
-abhijit.

संदीप चित्रे said...

स्नेहल,
मनातलं मनापासून लिहिलं ना की असा सुरेख लेख कागदावर उतरतो. तू नशीबवान आहेस की तुला असा मित्र आहे आणि तुझा मित्र नशीबवान आहे की तू त्याची मैत्रीण आहेस. तुमची मैत्री खूप छान आहे. खूप छान नातं असतं असं आपलं कुणी मित्र / मैत्रीण असणं म्हणजे !
संदीप