Sunday, January 28, 2007

यांना रस्ता दाखवा

२६ जानेवारी २००७, प्रजासत्ताक दिन, यंदा शुक्रवारी आल्याने माझ्यासारख्या key board बडवणार्या पामरांना long weekend मिळाला. एरवी अशा long weekend चे बेत मी आधीच केलेले असतात..पण या वेळी onsite जावं लागणार कि नाही या झुलत्या पुलामुळे काहिही बेत केला नव्हता. आणि आयत्यावेळी कुठेहि बुकिंग मिळाले नाही. म्हणून मग पुण्यात राहूनच जमेल तसा TP करण्याचे ठरवले. या निमित्ताने पुण्यनगरीतील अनेक जुन्या नवीन वास्तु, पावसाळा-हिवाळा संपून उन्हाळा तोंडावर आला तरी रस्त्यांची दुर्दशा, मनपा निवडणूकिच्या पार्श्वभूमीवर पुढार्यांची भाषणे असे बरेच काहि अनुभवायला मिळाले.
२६ तारखेला हुरडा खायला गेले. तसा हुरड्याचा हंगाम संपत आला पण म्हणलं जाउन बघु :) आळंदि रोड वर 'गोखले मळा' आहे..तिकडे गेले. जाताना कर्वे रोड, F C, JM रोड, संगम पूल, बंडगार्डन, विश्रांतवाडि असे पुणे दर्शन करत पोहोचलो. यातला जवळ जवळ ३०% रस्ता हा अनेक छोट्या खड्ड्यांनी भरला होता, २०% रस्ता PMT चे थांबे, बस ची वाट बघणारे लोक, parking इ. मुळे व्यापला होता. १५% रस्त्यावर concrete च्या नवीन रस्त्याचे काम चालू... म्हणजे राहता राहिला ३५% रस्ता. यातहि रिक्षवाले, बेफ़ाम दुचाकि यांना प्राधान्य!!! पण हे सगळे आपल्या इतके अंगवळणी पडले आहे कि लोकांनी या ३५% च समाधान मानावे. शाळेपासूनच आपल्याला ३५ चे महत्त्व!!! मायबाप सरकार तरी कसे अपवाद असेल याला? ३५% आहे ना...मग पास च आहे कि :)
२७ तारखेला आईसोबत खरेदिचा योग आला. उन्हाचा त्रास नको म्हणून रिक्षेनेच निघालो. या रिक्षावाल्यांचे driving skill अफ़ाट असते. signal ला कुठल्या गाडिच्या मागे थांबणे म्हण्जे यांना अपमान वाटत असावा!!! बरं, कार म्हणू नका, बस म्हणू नका..हे बिनधास्त कोणाला कसेहि overtake करू शकतात. दरवर्षी श्रावणात सत्यनारायणाची पूजा केली कि यांचे वर्षभरातले driving चे अपराध देव माफ करत असावा.
खरेदिचे ठिकाण नेहमीचेच.. लक्ष्मी रोड!!! असंच इकडे तिकडे बघत चालले होते. PNG कडे शोकेस मध्ये लावलेला १ हार बघण्यासाठी थांबले तर १ पाय खड्ड्यात!!! खाली बघते तर एखाद्या खंदकाचा भाऊ शोभेल असा खड्डा. मनात आलं हार नुसता बघण्यासाठी मला खड्ड्यात जावं लागतंय तर.....
२८ तारखेला एका मित्राकडे वास्तुशांतीला जायचं होतं. त्याचं घर बाणेर-बालेवडी च्या मध्ये.... घरी दादाला कार हवी होती म्हणून मी माझी दुचाकि काढली. बर्याच दिवसांनी मी असं सलग १५-१८ कि.मी. दुचाकि चालवणार होते. पावसाळ्यात जिथे खड्डे पडले होते तिथे मायबाप सरकारने भर टाकून speed breaker सद्रुश उंचवटे केले आहेत. यावरून गाडि चालवायची तर कुठलाहि पुणेकर दुचाकि चालक motocross मध्ये भाग घेऊ शकतो. सामान्य जनतेला 'श्याम कोठारी' होण्याची स्वप्ने दाखवणारे सरकार किती ते महान!!! काहि रस्त्यांवर नव्याने खड्डे आहेत.... हे खड्डे चुकवून पुढे जाता न जाता तोच रस्त्यावर बारिक खडि असते. तुम्ही जर नवशिके असाल किंवा थोडेसे गाफिल असाल तर या खडीवरून हमखास घसरणार. आत असं पाहा, यात समाजाचा सर्वांगीण विकास आहे. तुम्ही पडलात तर -
१. तुम्हाला लागेल. पर्यायी doctor ला पैसे मिळतील.
२. गाडीला लागेल. mechanic साठी रोजगार निर्माण झाला.
३. तुम्ही हेल्मेट घातले नसेल तर तुम्हाला त्याचे महत्त्व पटेल नि ते खरेदि कराल.
४. पुढच्या वेळेपासून तुम्ही अधिक जबाबदारिने गाडि चालवाल.

रस्त्यात थोडीशी खडी टाकून सरकारने किती दूरदृष्टी ठेवली आहे बघा!!!

आता हे सगळे ज्या सरकारने तुम्हा-आम्हा साठी केले... त्यांनी कधी भावनाविवश होऊन म्हटले कि 'मी म्हणजेच पुणे' तर काय बिघडलं हो?

आणि जर बिघडलं असं वाट्तं असेल तर या सत्ताधायांना रस्ता दाखवा!!!

2 comments:

सहज said...

zoplelya la uthavata yeta
pan zoplyache song ghenaryala kase uthavanar ?

सहज said...

I have used Baraha 7.0 software for coverting into marathi font and then copy paste in blog editor.

how do u do it for urs ?