Wednesday, January 17, 2007

प्रेमरोग - चूक कोणाची??

साधारण २ आठवड्यांपूर्वी दुपारी जेवताना तिने आम्हाला तिच्या लग्नाची बातमी दिली. तिचं लग्न ठरलं होतं येत्या महिन्यात. हे सगळं सांगताना जाम खूष दिसत होती :) . लग्न कोणाशी होणार याची आम्हा सगळ्यांनाच कल्पना होती. ती माझी आधीच्या office मधली मैत्रीण.. मैत्रीण पे़क्शा collegue म्हणू. तिच्याच टिम मधला तो एक. office मध्ये त्यांच्या बद्दल खूप gossip चालायचं. पण त्यांचं वागणं कधीच आम्हाला awkward वाटलं नाहि. छान परिपक्व वाटायचे. मी इथे join झाल्यावर थोड्याच दिवसात मी तिला इथे refer केलं आणि ती इकडे join झाली. तेव्हापासून आमची मैत्री झाली.

तिने लग्नाची बातमी दिल्यापासून मी तिला officially चिडवायला सुरूवात केली होती. अगदि सुरू कधी झालं, propose कोणी केलं पासून HM कुठे जाणार पर्यंत सगळे details विचारून झाले माझे. :) बोलता बोलता कळलं कि तिच्या घरून विरोध आहे...जबरदस्त!!! कारण तेच पुरातन... तो सिंधी आहे. एवढं एक वगळता त्या मुलामध्ये नाकारण्याचं खरच काहि कारण नाही. पण अपेक्शाभंगाच्या दु:खापुढे सगळं च कस्पटासमान असतं. जावई आपल्या जातीतला असावा ही त्यांच्या द्रुष्टिने माफ़क अपेक्शा..जिचा भंग ते सहन करू शकत नव्हते. शिवाय समाज, प्रतिष्टा.. मुलीवरचे संस्कार हे सगळं pressure असेलच.

आम्ही तिला समजावत होतो कि हळूहळू ठीक होईल सगळं.. आई बाबांचा राग निवळेल!!! positive विचार करून तिने पण लग्नाची तयारी चालू केली. खरेदि झाली, hall booking झालं. अगदि आमची spinster's party पण झाली. तिचे आई बाबा अजून त्यांच्या मताशी ठाम होते.

परवा १ दिवस ती Office ला आली नाही. आमचे इथे तर्क चालू... कि madam चे shopping चालू असेल वगैरे :) दुसया दिवशी ती आली कधी हे कळलं नाही. आल्यावर direct email च. मेल मध्ये पण १ च वाक्य... "I want to talk to you...can u join me for T". मी गेले.

"काय madam, काल दांडी अचानक? क्या बात है??" माझा मिष्किल प्रश्न.
ती एकदम गंभीर....
"काय झालं ग?" मी
"My marriage is called off".........
"काय??? अगं postpone झालं का?" तिच्या called off या शब्दांवर माझा विश्वासच बसत नव्हता.
"नाही. cancel झालंय. आपण नंतर बोलु. पण आपल्या group मध्ये सगळ्यांना सांगायची शक्ती माझ्यात नाही. can u do it for me? please.."
मला काहि कळतच नव्हतं. हा काय प्रकार आहे? मी तिला "बरं" म्हणून जागेवर आले.

जमेल तसं सगळ्या group ला हा प्रकार सांगितला... सगळेच माझ्यासारखे हादरले होते. आज या गोष्टीला २ दिवस झाले. ती अजून त्या विषयावर माझ्याशी बोलली नाहिये. मी पण काहि विषय काढत नाहिये. ती शक्य तितकं normal राहण्याचा प्रयत्न करतेय. कौतुक वाटतं. तिचा विचार करून माझ्याच पोटात कसंतरी होतं... तिला काय होत असेल? काल पर्यंत ज्या माणसाबरोबर राहण्याची स्वप्न बघितली...तो आता नाही येणारे आयुष्यात?? कसं सहन करत असेल ती हे सगळं???? नक्कि कारण काय ते अजूनहि मला माहित नाही... पण एक नक्कि कि त्यांचं प्रेम आहे एकमेकांवर. मग असं का व्हावं???

मी तयार करते आहे स्वत:ला... ती जेव्हा माझ्याशी बोलायला येईल..तेव्हा मी तिला धीर कसा देउ? काय सांगू?? मी हे काम आधीहि १-२ मैत्रीणींसाठी केलं आहे.. पण ते वेगळं होतं. तिथे प्रेम म्हणजे gangrin होता, जो कापल्याशिवाय पर्याय नव्हता. कापला नसता तर त्रास झाला असता. मी तो कापवा लाग्णार यासाठी मानसिक तयारी करून घेतली आणि कापताना वेदना कमी होतील हे बघितलं होतं. आता ...आता काय करायचं आहे मला? कळत नाही. हे लिहिता लिहिता मला सरस्वतीचंद्र मधलं हे गाणं आठवतंय...
"छोड दे सारी दुनिया किसि के लिये
ये मुनासिब नहीं आदमी के लिये
प्यार से भी जरूरी कई काम है
प्यार सबकुछ नहिं जिंदगी के लिये.."

पण मला अजून हि वाटतं, कि त्या दोघांनी परत एकत्र यावं...तिच्या आई बाबांनी हसत हसत आशीर्वाद द्यावा....
आणि माझा पुढचा blog.."They happily lived ever after..." असा असावा...

8 comments:

Anonymous said...

आपला समाज व्यक्तिस्वातंत्र्याबाबत अजूनही प्रगल्भ नाही हाच मुद्दा आहे.

एक युक्ती:
क्श लिहिण्यापेक्षा kSh वापरून क्ष लिहिता येईल :)

Anonymous said...

:(

I hope parents agree and they live happily ever after .....

Anonymous said...

त्या दोघांनी एकत्र यायला हवं होतं हे खरं, but that is how life is! मला माहिती आहे, की म्हणणं फ़ार सोप्पं आहे,करणं अवघड. i believe that
" all is well that ends well. if its not well, its not the end."

Anonymous said...

:(_ __

स्वाती आंबोळे said...

सही लिहीलंय बड्स!!

Kamini Phadnis Kembhavi said...

हं......
:(

सहज said...

आणि माझा पुढचा blog.."They happily lived ever after..." असा असावा...

Aamin !!

Monsieur K said...

very, very unfortunate :(
hope things will work out soon for your friend.

~ketan