दिवस कसा सुरू झाला आणि कसा संपला कळतंच नाही आजकाल. एकामागून एक कामं येत राहतात आणि मी ती जमेल तशी टोलवत/ झेलत राह्ते.
असाच आजचा एक दिवस... ऑफिसला पोचायच्या आधीच एक फोन... "कधी येत आहेस? client कडून अमूक-अमूक escalation आहे. मला तो data हवाय." मनात आलं.."च्या मारी. सगळ्या e-mails वर कॉपी तर करते मी. मग मी नाही ऑफिस मध्ये तर data साधा compile करता येऊ नये??" पण असं कितीहि मनात आलं तरी तसं ते बोलता येतंच असं नाही.मग तुमच्या मनात काही खूप छान असो वा "च्या मारी.." टाईप काही. काही गोष्टी फक्त मनाशीच बोलाव्या लागतात. असो....
ऑफिस मध्ये आल्यावर मग सगळ्यात आधी client escalation परतवून लावलं. त्यासाठी मोठ्या लोकांपासून, लहानांपर्यंत २-३ meetings :(... मग खायला वेळ नाही...म्हणून diet वगैरे विसरून एक कुरकुरे! कामाचा ताण वाढला कि माझं वजन का वाढतं हे आत्ता मल कळलं.
एक एक काम उरकता उरकता ७:३० ची बस चुकली. सहज म्हणून मग g-talk ला login झाले. तर एक अगदी जुना नेट-मित्र भेटला. त्याचा अगदी अनपेक्षित प्रश्न खरं तर मला हे पोस्ट टाकायची खुमखुमी देऊन गेला. आत्तापर्यंत मी त्याला ४-५ वेळा तरी सांगितलं असेल कि माझा ब्लॉग वाच...अमूक पोस्ट..मायबोलीवरचं तमूक वगैरे... पण हा अगदी काला अक्षर भैंस बराबर सारखा माझे ब्लॉग वाचणं टाळतो. तर असा हा आज मला विचारत होता "howz ur blogging"... दिवसभराच्या वैतागानंतर त्याच्या प्रश्नाचं हसूच आलं. त्याला म्हणलं "काही सुचत नाहीये. आणि जे सुचतं ते लिहिण्याइतपत मोठं/ चांगल नाहीये".. तो नुसताच त्याच्या style मध्ये lol ला.
मी या आधीच पोस्ट टाकून जवळ जवळ ५ महिने झाले... केतन, प्रिया वगैरे मंडळी लिही लिही असं सांगून दमली. ब़याच जणांनी विचारलं कि लिहीत का नाही आहेस. यावर मी अगदी झोपेत देखील उत्तर दिलं असतं की "काही सुचत नाहीये".
खरंच सुचत नाहीये. कशावर लिहू? कंपनीने मला नवीन जबाबदारी देऊन ओझ्याचं गाढव केलं यावर...कि महिनाभर वेगवेगळ्या गाड्या चालवून मी zen estilo च का select केली यावर की गाडी चालवताना येणार्या जबरदस्त अनुभवांवर की रत्नागिरीला केलेल्या धमाल २ दिवसांबद्दल कि टेलर ने ड्रेस बिघडवल्यावर त्याच्याशी केलेल्या भांडणावर की google story वाचता वाचता sergey brin किती आवडला यावर?
लोकांचे ब्लॉग वाचले कि मजा वाटते..कसलं सुचतंय यांना!! आमचीच कुठे बोंब होते कळत नाही. पण काहीही असो.... माझे पोस्ट्स अगदी नियमीत वाचणारे मला लिहायला भाग पाडू शकले नाहीत ते काम ज्याने एकही पोस्ट वाचली नाही त्याने केलं. असं होतं का कधी कधी... कोणी काही म्हणलं म्हणून उगाचंच काहीतरी करावंस वाटतं ना?
Thursday, June 12, 2008
Subscribe to:
Posts (Atom)