मी योगासने करते...
मागच्या महिन्यापर्यंत मी व्यायाम वगैरे चा फारसा विचार हि केला नव्ह्ता.. हा आता नोकरीच्या आधी उन्हाळ्याच्या सुट्टित अधून मधून सकाळी फिरायला जायचे..पण त्यात व्यायाम हा हेतू कमी आणि मैत्रिणींबरोबर गप्पा च जास्त असायच्या...
तर दिवाळीच्या दरम्यान आई बरीच रागावली म्हणून मी माझे कपाट आवरायला घेतले.. त्यात मला एक माझी १.५ वर्षापूर्वीची जीन्स सापडली... मी ती कशी विसरले होते कोण जाणे.. दुसर्या दिवशी ती घालून बघायच ठरवलं. पण कसलं काय..त्या जीन्स चा साईझ आणि मी यात केन्व्हाच तफावत आली होती... मी हादरलेच... वजन वाढलयं हे कळत होतं पण जीन्स न येण हे म्हणजे अती होतं. काय करावे कळेना... आता नोकरी मुळे सकाळी फिरायला जाणंहि जमणार नव्हतं. काय करावे... काहिहि केले तरी नकळत वाढलेले वजन कमी करणे अत्यावश्यक होतं.
दरम्यान एक मेल आली.... इथे office मध्ये योगासन वर्ग चालू होणार होता.. मी खुष!!! लगेच नाव नोंदवून मोकळी झाले. मनात आलं योगासने शाळेत असताना पी.टी. ला करतच होतो कि...जमेल आपल्याला..पण मी पूर्ण चुकिची होते.
पहिल्या दिवशी ने सांगितले कि BP, heart problem इ. असलेल्या लोकांनी अमूक अमूक आसने करू नयेत. मला त्यातला काहिच त्रास नव्हता... म्हणजे मी सगळी आसने करू शकणार होते.. वा!!! अद्न्यनात किती सुख असतं. योगासने सुरू झाली. पहिले २ दिवस हलक्या फुलक्या आसनांचे होते.. पण त्याने सुद्धा माझे अंग इतके दुखले कि विचारू नका.... बसलं कि उठायला नको वाटायचं आणि उठले बसणे नको!!! म्हणलं सुरूवात आहे...सवय झाली कि कमी होईल.. परत गैरसमज!!!
असे करता करता २ आठवडे झाले... माझेच शरीर मला कि दुरापास्त झाले आहे हे मला एव्हाना कळून चुकलं होतं. शाळेतली पायाचे अंगठे धरण्याची शिक्शा इथे खरोखरच शिक्शा होती... पद्मासन घालताना तर देव आठवत होता. बाकि सगळं लांबच होतं... आमचा मास्तर प्रत्येक प्रकाराचे १५ counts घेतो... माझ्या पाठीला, पायाला ८-१० counts मध्येच अशी रग लागायची कि बास!!! गेल्या २ वर्षात जे जे काहि खाल्लं, ऐश केली त्याच्या प्रत्येक घडिला पश्चात्ताप होत होता... माझी बेफिकिरी च मला नडली होती. आमचा मास्तर मात्र मस्त आहे... त्याच्या शरिरात तर हाड आहे कि नाही अशी शंका यावी इतपत लवचिकता आहे.. तो कुठल्याहि अवस्थेत दोन हात, पाय, नाक, डोक..कात वाट्टेल ते एकमेकाला टेकवू शकते. धन्य आहे...
मी तर सध्या त्याच्या पुढे फक्त हात ठेकवू शकते. पण मी आशावाद टिकवून आहे. निदान ४-५ महिन्याने का होईना मला माझी "पुरानी जीन्स" परत व्यवस्थित घालता येइल याबाबत :)
Thursday, November 23, 2006
Subscribe to:
Posts (Atom)