Monday, October 22, 2007

भूतकाळाचे भूत...

गेले कित्येक दिवस काय होतंय ते कळत नाहीये. emotional downtime चालू आहे बहुतेक. मन सतत भूतकाळात जातं आणि तिथून त्याचा पाय निघत नाही. खरंतर आजवरच्या भूतकाळात इतकं रममाण होण्यासारखं काहिच नाही...आणि जे थोडंफार होतं, ते तर आता कायमचं गमावून बसले आहे (जसे कि बालपण). मग का सतत जुने दिवस आठवत असतील?? कि खास असं काही का घडलं नाही याचाच मागोवा घेतेय मी?? मन वर्तमान काळात १० मिनिटे आणि भूतकाळात २० मिनिटे अशा प्रमाणात आहे.
काहि जुन्या दिवसांच्या आठवणीने उगाचच गहिवर येतो.... सगळं आपण किती सहजतेने निसटून दिलं असं वाटतं. पण खरंच, निसटून चाललंय हे तेव्हा कळतंच नव्हतं. आणि आता ते इतकं लांब आहे कि तिथपर्यंत ना माझा हात पोचतो ना हाक!!! आणि समजा ते सगळं मला परत आणता आलं तरी मी स्वत: आता कुठे पूर्वीची तशी आहे??? तेव्हा ज्या गोष्टी जशा बघितल्या, अनुभवल्या तसं आत्ता जमेलच मला असं कुठे मी खात्रीने सांगू शकते?
काहि आठवणी इतक्या गोड आहेत कि आता तसं काहि घडत नाही याचं वाईट वाटतं. मोठी होत गेले नि निरगसत्त्व हरपलं. निर्व्याज आनंद देणाऱ्या गोष्टी कमी झाल्या. आता कधी कधी तर आनंद ’मानावा’ लागतोय...होण्याचे क्षण आहेत आजहि...पण संख्या नक्कीच कमी.
विचार करता करता दिवस निघून जातो. झोप येईपर्यंत विचार..... त्यामुळे झोप पण उशीरा!!! मग स्वप्न पण भूत-वर्तमान चे fusion वाटावे असे काहितरी. मग पुन्हा दुसरा दिवस. त्यात आता कालच्या अजून एका दिवसाची भर...आज तर ’काल’ पण भूतकाळ झालेला....

9 comments:

Monsieur K said...

Snehal,

e'one aspires for that child-like innocence; that ability of finding happiness in small-small things in life; those little moments of absolute bliss.

yes, we do indeed have many such moments during childhood; it is how we create those blissful moments in our life as adults that makes life interesting :)

hope you find those avenues soon!

Anonymous said...

Asa anubhav javal paas saglyanach kevha na kevhatari yet asava.

Pan faar chaan mandlay tumhi ha anubhav. Khup avadle!

Anonymous said...

hi snehal,

good morning :)

आनंद देणार्या अनेक लहान लहान गोष्टी अजूनही आजूबाजूला आहेत. ह्या फेजमधून बाहेर पडलीस की नक्की दिसतील. रोजचं रुटीन सोडून नवीन ठिकाणी जमल्यास एक चक्कर मार.

Dhananjay said...

I too believe that this is a 'state' which will be overcomed in 'some' time. Lekh awadala.

Dhananjay

Tulip said...

स्नेहल. आयुष्य नेहमी पुढेच जात असतं तर मग मागच्या आठवणी मग त्या कितीही रेंगाळा इथे म्हणून सांगत असल्या तरी त्यांचा हात सोडावा लागणारच नां? आत्ता लो मूड मधे आहेस जराशी म्हणून उगीच असे विचार करत बसली आहेस. चिअर अप!!

स्नेहल said...

Thanks everyone!

I know I will be out of this phase soon.... :)

Aaj ch manager la chukvun office time madhye jaun movie baghun aale. Doing something different like this, makes you feel better and takes you in lighter mood I guess.

Cool :)

अभिजित पेंढारकर said...

छान लिहिलंयस!

आठवणींच्या जगात रमायला सगळ्यांनाच आवडतं.
पण मग वास्तव हात आपला पाय खेचत राहतं.
वास्तवाच्या जोरावरच तर आपण आठवणींची आठवण काढू शकतो. खरं ना?

चंद्रशेखर गोखलेंची एक चारोळी आठवली...

आठवणींच्या जगात मी शक्यतो
मनाला पाठवत नाही.
जाताना ते खुशीत असतं,
पण येताना त्याला निघवत नाही...
....
btw, which movie did you see during office time?

TheKing said...

Man bhootkalat ramat asel tar, tyas tithech ramoo dyave. Saktine vartamanat anale tar te parat mage dhavnarach. Bhootkalat sadaiv rahne tyas kahi jamnar nahi, mag yeilach parat present madhye!

Yogesh said...

हम्म!

ह्या साईटवर रोज एक छान विचार असतो. http://www.greatday.com/

आणि हे गाणं ऐक नीट... मस्त आहे.

http://www.esnips.com/doc/5b0f9476-caa4-4b8e-91e3-d0dbac079785/Survivor---Eye-Of-The-Tiger